कोल्हापुरी खाद्यसंस्कृती म्हटली की डोळ्यासमोर येते ती झणझणीत, मसालेदार आणि रुचकर चव. त्यातही कांद्याचा झुणका हा कोल्हापुरी जेवणाचा अविभाज्य भाग मानला जातो. झुणका हा मूळतः बेसन पीठ वापरून तयार केला जाणारा पारंपरिक पदार्थ असला, तरी प्रत्येक प्रांतात त्याची चव आणि तयार करण्याची पद्धत थोडी वेगळी असते. तिखट मसाल्यांचा तडका, भरपूर कांदा आणि बेसन यांचं अप्रतिम मिश्रण म्हणजे हा झुणका! भाकरीसोबत खाल्ला तर त्याची चव दुपटीने वाढते(Kolhapuri Kanda Zunka recipe).
कोल्हापुरी स्टाईलमध्ये तयार केलेला कांद्याचा झुणका हा केवळ एक पदार्थ नसून, तो कोल्हापूरच्या मातीतील अस्सल आणि चमचमीत स्वादाचं प्रतीक आहे.अगदी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने तयार होणारा हा झुणका, भाकरी किंवा गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झक्कास असा चमचमीत पदार्थ आहे. कमी वेळात तयार होणारा हा चमचमीत, मसालेदार झुणका चवीला जबरदस्त आणि महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय आहे. झणझणीत कोल्हापुरी कांद्याचा झुणका खास पारंपरिक पद्धतीने कसा तयार (how to make Kolhapuri style Kanda Zunka) करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. तेल - ४ ते ५ टेबलस्पून २. मोहरी - १ टेबल्स्पून ३. कडीपत्ता - १० ते १५ पाने४. हिरव्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या५. जिरे - १ टेबलस्पून ६. हिंग - चिमूटभर७. कांदा - ४ कांदे (बारीक चिरुन घेतलेले)८. मीठ - चवीनुसार९. लसणाच्या पाकळ्या - ७ ते ८ पाकळ्या१०. हळद - १/२ टेबलस्पून ११. शेवग्याची पाने - १/२ कप (पर्यायी)१२. कांदा - लसूण मसाला - २ टेबलस्पून १३. बेसन पीठ - १ कप १४. पाणी - गरजेनुसार१५. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)१६. ओलं खोबरं - २ ते ३ टेबलस्पून
ना तांदूळ, ना तेल करा मऊ - लुसलुशीत व्हेजिटेबल इडली! चवीला उत्तम आणि पौष्टिक - नाश्ता होईल पोटभर...
महिनाभर टिकणारी आलं लसूण पेस्ट करण्यासाठी ८ टिप्स, टिकते छान-विकत आणायची गरजच नाही...
कृती :-
१. एका मोठ्या कढईमध्ये तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, कडीपत्ता, जिरे, हिंग, हिरव्या मिरच्या घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. २. त्यानंतर या खमंग फोडणीत बारीक चिरलेले कांदे घालावेत. कांदे तेलात हलकेच परतून घ्यावे. त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालावे.
डायबिटीस असेल तर गव्हाच्या नको 'या' पिठाच्या चपात्या खा! शुगर वाढण्याचं टेंशनच विसरा, जेवा पोटभर...
३. मग या कांद्याच्या मिश्रणात हळद व लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. त्यानंतर झुणका अधिक पौष्टिक होण्यासाठी यात आपण शेवग्याची पाने देखील घालू शकता. (पर्यायी) चवीनुसार कोल्हापुरी कांदा - लसूण मासाला घालावा. ४. कांद्याचे मिश्रण व्यवस्थित शिजत आल्यावर त्यात कोरडे बेसन वरून भुरभुरवून घालावे. मग बेसन कालवून पिठाच्या गाठी मोडून घ्याव्यात. ५. सगळ्यात शेवटी वरून कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. झुणका झाकून त्या झाकणात थोडे पाणी ओतून मंद आचेवर झुणका व्यवस्थित शिजवून घ्यावा.
झणझणीत कोल्हापुरी कांद्याचा झुणका खाण्यासाठी तयार आहे. हा गरमागरम झुणका भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी अधिक चविष्ट लागतो.
Web Summary : Kolhapuri Kanda Zunka is a spicy, flavorful dish made with onions and gram flour. This traditional recipe uses simple ingredients and is quick to prepare. Enjoy it with bhakri or chapati for a delicious, authentic Maharashtrian meal.
Web Summary : कोल्हापुरी कांदा झुणका प्याज और बेसन के आटे से बना एक मसालेदार, स्वादिष्ट व्यंजन है। यह पारंपरिक रेसिपी सरल सामग्री का उपयोग करती है और जल्दी से तैयार हो जाती है। स्वादिष्ट, प्रामाणिक महाराष्ट्रीयन भोजन के लिए इसे भाकरी या चपाती के साथ परोसें।