Join us  

Kitchen Tips : पावसाळ्यात तांदूळ किड लागून खराब होतात? 'या' ५ टिप्सनं वर्षानुवर्ष टिकवून ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 2:03 PM

Kitchen Tips : खराब झालेले हे तांदूळ साफ करायला तासनतास लागतात. इतकंच नाही तर  बायकांना दुपारची झोप मोडून ही कामं करायला लागतात. 

ठळक मुद्देस्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये लवंग हा सहज उपलब्ध असणारा मसाला आहे. लवंगाचा सुगंध हा किटकांना दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे.तुम्ही बाजारातून कमी प्रमाणात तांदूळ विकत घेत असाल तर पावसामध्ये किड्यांपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये साठवणे.

पावसाळ्यातील ओलाव्यामुळे विशेषत: तृणधान्यांमध्ये, किडे दिसू लागतात. हे कीटक केवळ धान्यांचे पौष्टिक मूल्यच कमी करत नाहीत तर धान्यांची चवही खराब करतात. किड तांदळासह, सगळ्या धान्याचे नुकसान करते आणि ते वापरण्यायोग्य राहत नाही.  हेच कारण आहे की ओलाव्यामुळे तांदूळ फार लवकर खराब होतात आणि खाण्यायोग्य नसतात. खराब झालेले हे तांदूळ साफ करायला तासनतास लागतात. इतकंच नाही तर  बायकांना दुपारची झोप मोडून किंवा इतर कामं बाजूला ठेवून ही कामं करायला लागतात. 

धान्य आणि डाळींना हवाबंद कंटेनरमध्ये थंड, कोरड्या जागी साठवण्याची शिफारस केली जाते. जेणेकरून ओलावा त्यांच्यात येऊ नये आणि किटकांपासून त्यांचे संरक्षण होईल. कधीकधी सर्व खबरदारी घेतल्यानंतरही, हे किटक तांदूळ खराब करतात. अशा परिस्थितीत काही सोप्या टिप्सचे पालन करून तुम्ही भातातील किटकांना लांब ठेवू शकता आणि तांदूळ  साठवून ठेवू शकता. 

तमाल पत्र, लिंबाची पानं

४ ते ५ तमालपत्रे आणि सुक्या कडुलिंबाची पाने तांदळाच्या डब्यात ठेवा. तांदळाला अळीपासून मुक्त करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे  तमालपत्र, कारण किड्यांना त्याचा सुगंध सहन होत नाही आणि किड त्याच्या सुगंधामुळे पळून जातात. इतकेच नाही तर कडुलिंबाची पाने देखील किड्यांची अंडी मारतात आणि किडे तांदळातून पूर्णपणे काढून टाकतात. अधिक चांगल्या परिणामासाठी, तांदूळ एका कंटेनरमध्ये तमालपत्र आणि कडुलिंबाच्या पानांसह ठेवा.

लवंग

स्वयंपाकघरातील मसाल्यांमध्ये लवंग हा सहज उपलब्ध असणारा मसाला आहे. लवंगाचा सुगंध हा किटकांना दूर करण्याचा एक चांगला मार्ग आहे. जर तुम्हाला तांदळाचे किटकांपासून संरक्षण करायचे असेल तर त्याच्या डब्यामध्ये 10 -12 लवंगा ठेवा. तांदळाच्या डब्यात कीटक असल्यास ते निघून जातील आणि जर किडे तेथे नसतील तर लवंगाचा वापर तांदूळ किड्यांपासून बचाव करण्यासही मदत करेल. जंतुनाशक म्हणून आपण तांदळाच्या बॉक्समध्ये लवंगा तेलाचे काही थेंब देखील घालू शकता.

लसणाच्या पाकळ्या

तांदळातील किड्यांपासून बचावासाठी तांदूळाच्या भांड्यात लसूण पाकळ्या घाला. साधारण 5 ते 10  पाकळ्या  तांदळात चांगल्या मिसळा.  लसणीची प्रत्येक कळी पूर्णपणे कोरडी  झाल्यानंतर बदूलन घ्या. लसणाचा सुगंध तांदळाचे किटकांपासून संरक्षण करण्यास मदत करतो.

तांदूळ उन्हात ठेवा

जर तांदळांमध्ये किटक दिसले तर तांदूळ काही काळ उन्हात ठेवा. असे केल्याने अळ्या आणि त्यांची अंडी दोन्ही नष्ट होतात. जर आपल्याला तांदूळ बराच काळ साठवावा लागत असेल तर तो जास्त वेळ उन्हात ठेवू नका, असे केल्यास तांदूळांचे तुकडे होऊ शकतात.

फ्रिजमध्ये ठेवा

तुम्ही बाजारातून कमी प्रमाणात तांदूळ विकत घेत असाल तर पावसामध्ये किड्यांपासून बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रेफ्रिजरेटरमध्ये साठवणे. जर घरी आणताच तांदूळ फ्रीजरमध्ये साठवला गेला, तर त्यातील सर्व किडे आणि त्यांची अंडी थंड तापमानामुळे नष्ट होतात. असे केल्याने भातामध्ये कधीही किटक येणार नाहीत. शक्यतो पावसाळ्यात तांदूळ मोठ्या प्रमाणात खरेदी करू नका.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स