बऱ्याचदा स्वयंपाकघरात ठेवलेल्या लोणच्याच्या किंवा मसाल्याच्या डब्यांचं झाकण इतक घट्ट होतं की, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ते उघडण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कदाचित तुम्हालाही अशा परिस्थितीचा सामना अनेकदा करावा लागला असेल. डब्याचं झाकण उघडताना हात लाल होतात आणि दुखू लागतात, पण घट्ट झाकण काही केल्या उघडत नाही.
हवामानातील आर्द्रतेमुळे काचेच्या आणि प्लास्टिकच्या भांड्यांचं झाकण खूप घट्ट होतं. झाकण उघडण्यासाठी व्यक्तीला प्रयत्न आणि वेळ दोन्हीही द्यावे लागतात. जर तुम्हालाही या प्रकारची समस्या वारंवार येत असेल, तर मास्टर शेफ पंकज भदौरिया यांची ही स्वयंपाकघरातील टीप तुमची समस्या झटपट सोडवणार आहे.
शेफ पंकज भदौरिया यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर डब्याचं घट्ट झाकण उघडण्याचं रहस्य शेअर केलं आहे. डब्याचं घट्ट झाकण उघडण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडं पाणी गरम करण्यासाठी ठेवा. ज्या डब्याचं झाकण घट्ट झालं आहे त्याचं झाकण बुडेल इतकंच पाणी पॅनमध्ये ठेवा. यानंतर, जेव्हा पाणी उकळू लागतं. तेव्हा तो डबा उलटा करा आणि ३ ते ४ मिनिटं पाण्यात बुडवून ठेवा.
डब्बा नंतर पाण्यातून बाहेर काढा आणि कपड्याने पुसून घ्या. कपड्याने झाकण आणि डब्बा पुसल्यानंतर आता डब्याचं झाकण उघडण्याचा प्रयत्न करा. ते झाकण लगेचच उघडेल. या ट्रिकने आपला वेळही वाचतो, हातही दुखत नाही आणि झाकणही उघडलं जातं.