Join us  

हिरवीगार कोथिंबीर- ताजा पुदिना उन्हाळ्यात लगेच सुकतात? ४ सोप्या ट्रिक्स- आठवडाभर राहतील ताजेतवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2024 6:58 PM

Kitchen Hacks: How To Store Coriander And Mint Leaves : उन्हाळ्यात कोथिंबीर आणि पुदिना स्टोर करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा..

उन्हाळ्यात आपण फळे आणि भाज्या आणतो, पण ते अधिक काळ फ्रेश राहू शकत नाही (Kitchen Tips). कधी कुजतात, तर कधी वळतात. अनेकदा आपण भाज्यांसोबत कोथिंबीर, पुदिना खरेदी करून फ्रिजमध्ये ठेवतो. पण काही वेळेला कोथिंबीर, पुदिना लवकर खराब होते आणि सुकते. पाने एकतर कोमेजतात किंवा कुजायला लागतात.

काही लोक स्वस्तात मिळतं म्हणून कोथिंबीर आणि पुदिन्याची जुडी खरेदी करतात. पण नीट निवडून स्टोर करून ठेवली नाही तर, खराब होते. शेवटी कुजलेली कोथिंबीर आणि पुदिना फेकून देण्याची वेळ येते. उन्हाळ्यात कोथिंबीर आणि पुदिना वाळून-कुजू  नये असे वाटत असेल तर, काही टिप्स फॉलो करा(Kitchen Hacks: How To Store Coriander And Mint Leaves).

कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने ताजी ठेवण्यासाठी टिप्स

- स्वस्तात मिळते म्हणून कोथिंबीर आणि पुदिना घरी आणत असाल तर, खरेदी करण्यापूर्वी जुडी व्यवस्थित तपासून घ्या. जर जुडीमध्ये जास्त माती आणि पाणी असेल तर, ती लवकर खराब होऊ शकते.

कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि..

- कोथिंबीर आणि पुदिन्याची जुडी आणल्यानंतर निवडून घ्या. खराब, कुजलेली पाने वेगळी करा, आणि निवडलेली पानं एका डब्यात स्टोर करून फ्रिजमध्ये ठेवा.

- डब्यात स्टोर करूनही कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने कुजत असतील तर, एका भांड्यात पाणी भरून ठेवा. कोथिंबीरच्या देठांसह पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे कोथिंबीर आणि पुदिना दोन-तीन दिवस ताजी राहील.

बादल्यांवरचे पांढरे डाग घासूनही निघत नाहीत? चमचाभर बेकिंग सोड्याचा उपाय; बादल्या दिसतील नव्यासारख्या

- जर आपण कोथिंबीर जास्त प्रमाणात खरेदी केली असेल तर, हळदीच्या पाण्यात ठेवा. प्रथम, कोथिंबीर निवडून स्वच्छ करा. तासाभरानंतर सुती कापडावर पसरवा. एक डबा घ्या, त्यात टिश्यू पेपर घालून त्यात वाळलेली कोथिंबीर पसरवा, आणि डब्याचं झाकण लावा. टिश्यू पेपर ओलावा शोषत राहील. ज्यामुळे कोथिंबीर लवकर खराब होणार नाही.

- जर आपल्याकडे फ्रिज नसेल तर, आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं देठांसह पाण्यात ठेऊ शकता. यामुळे पुदिना आणि कोथिंबीर अधिक काळ टिकेल. 

टॅग्स :किचन टिप्ससोशल व्हायरल