Join us
Daily Top 2Weekly Top 5

खान्देश स्पेशल, चमचमीत...फौजदारी डाळ! नावातच दरारा, झणझणीत रस्सा आणि लालभडक तर्री - एकदा खाल्लीत की चव विसरणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2026 14:45 IST

Khandesh Spceial Faujdari Daal Recipe : How To Make Khandesh Spceial Faujdari Daal At Home : नावच इतकं दमदार! खान्देश स्पेशल फौजदारी डाळीची अस्सल झणझणीत रेसिपी...

महाराष्ट्रभर खान्देशी खाद्यसंस्कृतीची एक वेगळीच ओळख आहे. खान्देश म्हणजे झणझणीत, तिखट आणि चविष्ट जेवणाची खास ओळख... झणझणीत रस्सा, वरून तरंगणारी लालभडक तर्री आणि जिभेवर रेंगाळणारी लसूण-मसाल्यांची चव.. हीच काय ती खान्देशच्या 'फौजदारी डाळीची' खासियत... नाव ऐकलं तरी तोंडाला पाणी सुटेल अशी ही डाळ खान्देशातील घराघरात आवडीने केली जाते. या खान्देश स्पेशल डाळीचं नाव जरी थोडं वेगळं वाटत असलं, तरी चवीच्या बाबतीत ही डाळ एकदम जबरदस्त लागते. तिखट, झणझणीत आणि मसाल्यांचा खमंग स्वाद असलेली ही डाळ साधी नसून जेवणाची लज्जत खरीखुरी लज्जत वाढवते. गावाकडच्या चुलीवर, सण-समारंभात किंवा खास पाहुण्यांसाठी हमखास केली जाणारी फौजदारी डाळ तिच्या नावाइतकीच दमदार असते(Khandesh Spceial Faujdari Daal Recipe).

जिभेचे चोचले पुरवणारी खान्देश स्पेशल 'फौजदारी डाळ'! ही केवळ डाळ नसून खान्देशी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. डाळ शिजवण्याची खास पद्धत, भरपूर लसूण-मिरचीचा ठेचा आणि खान्देशी मसाल्यांचा तडका यामुळे या डाळीची चव मनात घर करून राहते. लसणाची फोडणी आणि काळा मसाला वापरुन तयार केलेली डाळ बाजरीची भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम चवीचा आनंद देते. रोजची तीच ती नेहमीची डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर, काहीतरी वेगळं आणि ( How To Make Khandesh Spceial Faujdari Daal At Home) खान्देशी ठसका हवा असेल तर एकदा 'फौजदारी डाळीचा' फक्कड बेत करायला हवाच...  

साहित्य :-

१. उडीद डाळ - २ टेबलस्पून२. पिवळी मूग डाळ - २ टेबलस्पून३. हरभरा डाळ - २ टेबलस्पून४. मसूर डाळ - २ टेबलस्पून५. तूर डाळ - २ टेबलस्पून६. किसलेलं सुकं खोबरं - १/२ वाटी७. कांदा - १ कप (उभा चिरलेला)८. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून९. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१०. लाल तिखट - १ टेबलस्पून११. काळा मसाला  - १ टेबलस्पून१२. हिंग - चिमूटभर१३. मोहरी - १ टेबलस्पून१४. जिरं  - १ टेबलस्पून१५. हळद १/४ टेबलस्पून१६. मीठ - चवीनुसार१७. तेल - गरजेनुसार

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

पुणे-सोलापुरात फेमस डिस्को भाजी, नाव अजबगजब पण चव भन्नाट-पाहा चमचमीत रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका भांड्यात सगळ्या डाळी एकत्रित घेऊन त्या पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्याव्यात. २. आता प्रेशर कुकरमध्ये या सर्व धुतलेल्या डाळी ओतून त्यात गरजेनुसार पाणी व चमचाभर तेल घालून २ ते ३ शिट्ट्या काढून सर्व डाळी व्यवस्थित शिजवून घ्याव्यात. ३. पॅनमध्ये तेल घेऊन त्यात उभा चिरलेला कांदा, सुकं खोबरं, आलं - लसूण पेस्ट घालून हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यावे. हे तयार मिश्रण थोडे थंड होऊ द्यावे. मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये घालून त्याचे वाटण तयार करुन घ्यावे. ४. आता एका कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. या फोडणीत तयार केलेलं कांद्या - खोबऱ्याचं वाटण घालून ते देखील तेलात खरपूस परतवून घ्यावे. 

ना तंदूर, ना ओव्हन! प्रेशरकुकरमध्ये करा अस्सल ढाबा स्टाईल तंदुरी रोटी - मऊ, कुरकुरीत...

३. त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार हळद, लाल तिखट, काळा मसाला घालून या तयार मसाल्यांना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावे. ४. मग या वाटणाच्या मिश्रणात प्रेशर कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ घालावी मग यात गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालावे. ५. डाळीला एक हलकीशी उकळी येऊ द्यावी मग वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 

खान्देश स्पेशल गरमागरम, झणझणीत आणि चमचमीत चवीची फौजदारी डाळ खाण्यासाठी तयार आहे. वाफाळता भात किंवा भाकरी, चपातीसोबत ही डाळ खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Khandesh Special Faujdari Daal: Spicy, flavorful, and unforgettable!

Web Summary : Khandesh's Faujdari Daal is a spicy lentil dish. Made with mixed dals, special spices, and a garlic tempering, this dish offers a unique and flavorful experience. This daal is a culinary gem.
टॅग्स :अन्नपाककृती