Join us  

टिपिकल गुजराथी पद्धतीचा पारंपरिक खमण ढोकळा खायचाय? करा फक्त १५ मिनिटांत, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 5:15 PM

Khaman Dhokla Recipe - Soft & Spongy Instant Gujarati Recipe : विकतसारखा परफेक्ट खमण ढोकळा घरी करायचा आहे? मग एकदा ही रेसिपी पाहाच..

नाश्त्याला नेहमी आपण पोहे आणि उपमा खातो (Khaman Dhokla). बऱ्याचदा घरात चपाती आणि भाजी देखील असते. शिवाय इडली-डोसेही खातो. पण हेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो (Cooking Tips). जर आपल्याला नाश्त्यामध्ये महाराष्ट्रीयन आणि साऊथ आणि इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, गुजराथी स्पेशल ढोकळा घरात करून पाहा (Recipe).

डाळ-तांदुळाचा खमण ढोकळा सहसा घरी परफेक्ट होत नाही. ढोकळा फुलत नाही, किंवा चव हवीतशी येत नाही. जर आपल्यला गुजराथी पद्धतीचा ढोकळा घरी करायचा असेल तर, एकदा ही रेसिपी पाहा. फक्त डाळ आणि तांदुळाचे योग्य प्रमाण, आणि काही मसाले. ढोकळा परफेक्ट तयार होईल. शिवाय चवीलाही भन्नाट लागेल(Khaman Dhokla Recipe - Soft & Spongy Instant Gujarati Recipe).

डाळ तांदुळाचा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

चणा डाळ

तांदूळ

तेल

मोहरी

जिरं

तुम्हाला लव्हेरिया नाही पण 'लव्ह ब्रेन'चा आजार नक्की असेल, पाहा ही लक्षणे.. आजार गंभीर आहे..

मीठ

साखर

पाणी

कडीपत्ता

हिरवी मिरची

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप जाड तांदूळ आणि एक चणा डाळ घ्या. त्यात एक कप पाणी घालून डाळ - तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. त्यात पाणी घाला, आणि ५ ते ६ तासांसाठी डाळ - तांदूळ भिजत ठेवा. ६ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेली डाळ-तांदूळ काढून त्याची पेस्ट तयार करा.

विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर..

तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. पीठ फरमेण्ट करण्यासाठी ८ तासांसाठी ठेवा. पीठ फरमेण्ट झाल्यानंतर त्यात एक चमचा तेल, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, आलं-मिरचीचा ठेचा घालून चमच्याने मिक्स करा. एका ताटाला तेल लावून घ्या. त्यावर बॅटर ओतून घ्या. एका कढईत स्टॅण्ड ठेवा. त्यावर बॅटरचं ताठ ठेवा, आणि झाकण लावा. १५ मिनिटासाठी वाफेवर ढोकळा शिजवून घ्या.

१५ मिनिटानंतर गॅस बंद करा. फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. नंतर त्यात जिरं, मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची, साखर आणि थोडं पाणी घाला. तयार फोडणी ढोकळ्यावर ओतून घ्या. आणि डिश सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स