दक्षिण भारतातील पदार्थ म्हटलं आपल्याला आठवतात इडली, डोसा, सांबार आणि मेदू वडा. पण कर्नाटक भागात सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे सांबार.( Karnataka style sambar) चवीला थोडा आंबट-गोड, दाटसर आणि सुगंधी असतो. अनेकदा याची चव आपण अण्णाकडे किंवा हॉटेलमध्ये चाखतो पण अनेकांना घरी बनवताना जमत नाही.(Udupi sambar) पण योग्य पद्धतीने आणि थोड्या टिप्स वापरल्या तर हा खास सांबार अगदी घरीच, तोही कुकरमध्ये फक्त १५ मिनिटांत तयार करता येतो.(South Indian sambar recipe)उड्डपी सांबारची खरी ओळख म्हणजे त्यात वापरले जाणारे साहित्य आणि खास मसाला. इतर सांबारप्रमाणे फार तिखट किंवा आंबट न वाटता हा सांबार खूप बॅलन्स्ड चवीचा असतो. यामध्ये डाळींचा दाटपणा, भाज्यांची नैसर्गिक चव आणि नारळाचा सुगंध सुंदर संगम असतो. त्यामुळेच हा सांबार इडली, डोसा, वडे, उत्तप्पा किंवा साध्या भातासोबतही अप्रतिम लागतो. पाहूयात कुकरमध्ये उड्डपी स्टाइल सांबार कसा बनवायचा.
वाफाळत्या भातासोबत खा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, पचायला हलकी- चवीला मस्त, करा ५ डाळींचा खास मेळ
साहित्य
तुरीची डाळ - अर्धा कप तेल - २ चमचा जिरे - १ चमचा मेथी दाणे - अर्धा चमचा तांदूळ - १ चमचा धने - १ चमचाहिंग- १/४ चमचा लवंग -२ हिरवी वेलची - १मोहरी - १ चमचालसूण पाकळ्या - ४ ते ५आले - १ इंचचिरलेला नारळ- २ टीस्पूनकढीपत्ता - १० ते १२सुक्या लाल मिरच्या- ३ ते ४ हळद - अर्धा चमचाकाश्मिरी मिरची पावडर - १ चमचा चिरलेला कांदा - १ मीठ - अर्धा चमचा हिरवी मिरची - १दुधी - १ कप चिरलेला टोमॅटो - २ भोपळा - अर्धा कप मीठ - चवीनुसार चिंच चटणी - अर्धा कप गूळ - १ चमचा
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला तुरीची डाळ स्वच्छ धुवून १ तास पाण्यात भिजवावी लागेल. यानंतर कढईमध्ये तेल, जिरे, मेथी दाणे, चणाडाळ, तांदूळ, धने आणि हिंग घाला. नंतर लसूण, वेलची, लवंग, आले, खोबरे, कढीपत्ता आणि लाल मिरची घाला.
2. वरुन हळद, लाल तिखट,मीठ आणि कांदा घालून चांगले परतवून घ्या. कुकरमध्ये तेल, मोहरी, दुधी, भोपळा, गाजर, टोमॅटो आणि कांदा, मीठ घालून परतवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात परतवून घेतलेला मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट कुकरमध्ये घालून पुन्हा परवतून घ्या. वरुन पाणी घाला.
3. त्यात भिजवलेली तुरीची डाळ आणि पाणी घालून कुकरच्या ४ शिट्टा करा. यानंतर त्यात गूळ, चिंचेची चटणी घालून ढवळून घ्या. फोडणीसाठी एका भांड्यात तेल, मोहरी, लाल मिरच्या,कढीपत्ता, हिंग घालून डाळीला वरुन फोडणी द्या. तयार होईल उडप्पी स्टाइल सांबार.
Web Summary : Make delicious Udupi sambar at home in just 15 minutes using a cooker! This South Indian dish, popular in Karnataka, offers a balanced flavor with lentils, vegetables, and coconut. Enjoy it with idli, dosa, or rice.
Web Summary : कुकर का उपयोग करके केवल 15 मिनट में घर पर स्वादिष्ट उडुपी सांभर बनाएं! कर्नाटक में लोकप्रिय यह दक्षिण भारतीय व्यंजन, दाल, सब्जियों और नारियल के साथ एक संतुलित स्वाद प्रदान करता है। इसे इडली, डोसा या चावल के साथ आनंद लें।