Join us  

करिना कपूरला आवडतो स्पेशल दाल तडका, पाहा फोडणी घालण्याची तिची अनोखी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2024 1:55 PM

Kareena Kapoor favourite Tadka dal recipe : दाल तडका करण्याची स्पेशल पद्धत, १० मिनिटांत करा चमचमीत डाळ

फिटनेस क्वीन बेबो अर्थात करिना कपूरचा डाएट सर्वांना जाणून घेण्याची इच्छा असते (Kareena Kapoor). दोन मुलांची आई असूनही, बेबोने स्वतःला मेन्टेन ठेवलं आहे. तिचा जन्म पंजाबी घरात झालेला आहे. त्यामुळे ती प्रचंड फुडी आहे. विविध प्रकारचे ती पदार्थ खात जरी असली, तरी तिला डाळ-भात खायला प्रचंड आवडतं (Daal-Bhaat). भारतीयांचे पोट डाळ-भाताशिवाय भरत नाही (Daal Tadka).

डाळ-भात खरंतर एक कम्फर्ट फूड आहे. तिने काही वर्षांपूर्वी डाळ तडका बनवण्याची रेसिपी एका मुलाखतीत शेअर केली होती (Cooking Tips). ज्यामध्ये बेबोने डाळीला तडका कसा द्यायचा? तिला कोणत्या प्रकारचा डाळ तडका खायला आवडतो? याची माहिती शेअर केली होती. प्रत्येकाची डाळीला तडका देण्याची पद्धत वेगळी आहे. पण करिना डाळ तडका कशी तयार करते? पाहूयात(Kareena Kapoor favourite Tadka dal recipe).

डाळ तडका करण्यासाठी लागणारं साहित्य

तेल

जिरं

कांदा

हिरवी मिरची

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड भरपूर खाल्ले तर वजन कमी होते? पण कुणाचे-कुणी न खाणंच बरं..

टोमॅटो

लसूण

कोथिंबीर

मीठ

अशा पद्धतीने करिना देते डाळीला तडका

सर्वप्रथम, एका भांड्यात २ मोठे चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात, एक चमचा जिरं, एक मोठा बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला एक टोमॅटो, बारीक चिरलेल्या ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या घालून मिक्स करा. साहित्य लालसर झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद घाला.

२ कप रवा आणि पाणी, रव्याच्या कुरड्या करण्याची इन्स्टंट रेसिपी; फुलतात तिप्पट-चवही जबरदस्त

साहित्य भाजून घेतल्यानंतर त्या फोडणीत एक मोठा बाऊलभर शिजवलेली डाळ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. डाळीला उकळी फुटल्यानंतर, शेवटी कोथिंबीर भुरभुरून भातासोबत डाळीचा आस्वाद लुटा. अशा प्रकारे साधी सिंपल करिना स्पेशल डाळ तडका खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :करिना कपूरअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स