Join us

गरमागरम भाकरी आणि कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी! अस्सल गावरान पारंपरिक पदार्थ - बेत होईल खास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2025 11:59 IST

Kandyachya Patichi Chutney : Maharashtrian Style Spring Onion Chutney : Kandyachya Patichi Chutney Recipe : कांद्याच्या पातीची चमचमीत गावरान चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी...

पावसाळा म्हणजे बाजारांमध्ये मस्त हिरव्यागार, ताज्या भाज्या मिळण्याचा मौसम. या ऋतूंत मिळणाऱ्या ताज्या, हिरव्यागार पालेभाज्याचे अनेक चविष्ट पदार्थ तयार (Kandyachya Patichi Chutney) करता येतात. यात मस्त अगदी बारीक पातीची, हिरवीगार कांदयाची पात आपण हमखास विकत आणतो. कांद्याच्या पातीचे ( Kandyachya Patichi Chutney Recipe) वेगवेगळे चविष्ट आणि रुचकर पदार्थ तयार केले जातात. असाच एक खास आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे कांद्याच्या पातीची चमचमीत, झणझणीत चटणी(Maharashtrian Style Spring Onion Chutney).

कांद्याच्या हिरव्या पातीत पौष्टिकता भरपूर असते, याची चमचमीत चटणी चविष्ट तर असतेच, पण शरीरासाठीही फायदेशीर असते. कांद्याच्या पातीपासून तयार केली जाणारी चमचमीत चटणी हा एक पारंपरिक गावरान पदार्थ आहे. या चटणीची खासियत म्हणजे ती खूप कमी वेळात झटपट तयार करता येते आणि साध्यासुध्या जेवणाची रंगत वाढवते. यंदाच्या पावसाळ्यात, गरमागरम भाकरी किंवा भातासोबत चमचमीत, मसालेदार कांद्याच्या पातीच्या चटणीचा बेत तर झालाच पाहिजे. हिरव्यागार कांद्याच्या पातीची झणझणीत चटणी करण्याची सोपी रेसिपी.

साहित्य :- 

१. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)२. पातीचा कांदा - ३ टेबलस्पून ३. कोथिंबीर - २ टेबलस्पून ४. शेंगदाण्याचा कूट - २ टेबलस्पून ५. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ६. आलं - १ टेबलस्पून (किसलेलं आलं)७. लसूण पाकळ्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या)८. काश्मिरी लाल मिरची पावडर - २ टेबलस्पून ९. मीठ - चवीनुसार१०. हळद - १/४ टेबलस्पून ११. चिलीफ्लेक्स - १ टेबलस्पून १२. काळीमिरी पूड - १/४ टेबलस्पून १३. गूळ पावडर / साखर - १ टेबलस्पून १४. गरम तेल - १/२ कप १५. लिंबाचा रस - १ टेबलस्पून  

Ashadhi Ekadashi Food : कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे करा झटपट, खास एकादशी स्पेशल पदार्थ...

Ashadhi Ekadashi 2025: कपभर साबुदाण्याचा खमंग, खुसखुशीत उपवासाचा पराठा, १० मिनिटांत खिचडीपेक्षा भन्नाट पदार्थ..

कृती :- 

१. सगळ्यांतआधी एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, किसलेलं आलं, शेंगदाण्याचा कूट, पांढरे तीळ, काश्मिरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, हळद, चिलीफ्लेक्स, काळीमिरी पूड, बारीक चिरलेला लसूण, थोडी साखर असे सगळे पदार्थ एकत्रित करून घ्यावे. 

Maharashtrian Alu Vadi Recipe: अस्सल मराठी चवीची पारंपरिक अळूवडी करायची आहे? ‘हे’ घ्या परफेक्ट प्रमाण...

२. हे बाऊलमधील सगळे पदार्थ चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावेत. ३. आता एका वेगळ्या भांड्यात तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. तेल तापल्यानंतर गरम तेल या बाऊलमध्ये ओतून चटणीला खमंग अशी फक्त तेलाची फोडणी द्यावी. ४. फोडणी दिल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने सगळे जिन्नस कालवून एकजीव करून घ्यावेत. त्यानंतर सगळ्यात शेवटी वरुन लिंबाचा रस घालून ही कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी खाण्यासाठी तयार आहे.

गरमागरम भाकरी, टम्म फुगलेली चपाती किंवा अगदी भातासोबत देखील आपण ही मस्त चमचमीत चटणी चवीने खाऊ शकतो.

टॅग्स :अन्नपाककृती