थंडीचे दिवस म्हटलं की, बाजारांत हिरव्यागार, ताज्या, फ्रेश भाज्या दररोज विकायला ठेवलेल्या असतात. हिरव्यागार भाज्यांमध्ये कांद्याची पात ही अशीच एक उत्तम चवीची पौष्टिक भाजी... बाजारांत हिरवीगार, ताजी कांद्याची पात दिसली की आपण हमखास विकत घेतोच. मग इतर पदार्थांवर भुरभुरवून घालण्यासाठी किंवा याच पातीचे अनेक चविष्ट पदार्थ घरोघरी मोठ्या हौसेने तयार करून फस्त केले जातात. कांद्याच्या पातीची फक्त भाजी किंवा झुणकाच नाही, तर कांद्याच्या पातीचा उपयोग करून बनवलेली भजी चवीला अप्रतिम लागते. थंडीचा तडाखा वाढताच गरमागरम भजी खाण्याची इच्छा आपोआपच जागी होते.(Kandyachya Patichi Bhaji Recipe).
नेहमीच्या कांदा, बटाटा किंवा मिरची भज्यांपेक्षा काहीतरी वेगळं आणि चवदार करायचं असेल, तर कांद्याच्या पातीची भजी हा एक उत्तम पर्याय ठरतो. जर तुम्हाला नेहमीच्या (How To Make Spring Onion Pakoda At Home) भजींचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी नवीन ट्राय करायचे असेल तर कांद्याच्या पातीची भजी एकदम बेस्ट पदार्थ आहे. कांद्याच्या पाती केवळ चवीला छान नसतात, तर त्या पौष्टिकही असतात. कमी साहित्यांत, झटपट तयार होणारी ही भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतात. चहा किंवा कॉफीसोबत खाण्यासाठी अगदी परफेक्ट असलेली कांद्याच्या पातीची भजी एकदा तयार केली की मिनिटभरात फस्त होतेच. अतिशय कमी तेलात कुरकुरीत (Spring Onion Pakoda Recipe) होणाऱ्या कांद्याच्या पातीच्या भजींची ही खास रेसिपी पाहा...
साहित्य :-
१. कांद्याची पात - १ कप (मध्यम आकारात चिरुन घेतलेली)
२. मीठ - चवीनुसार
३. ओवा - १ टेबलस्पून
४. हळद - १/२ टेबलस्पून
५. गरम मसाला - १ टेबलस्पून
६. बेसन - १ ते २ टेबलस्पून
७. पाणी - गरजेनुसार
अस्सल गावरान पद्धतीची हिरव्या टोमॅटोची चटणी, भाजीची गरज नाही-पोळीभाकरीसोबत पोटभर जेवण...
अस्सल खान्देशी उडीद वडे, चव झणझणीत अशी की खाताच म्हणाल वाढा आणखी! पारंपरिक चवीचा बेत...
कृती :-
१. कांद्याची पात स्वच्छ धुवून खालच्या कांद्याचे देठ काढून या कांद्याच्या पातीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. पातीच्या शेवटी असणाऱ्या कांद्याचे देखील छोटे - छोटे तुकडे तयार करून घ्यावेत.
२. या चिरून घेतलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, ओवा, हळद, गरम मसाला आणि बेसन घालून मिश्रण व्यवस्थित हाताने हलकेच कालवून घ्यावे.
३. मग या कालवून घेतलेल्या मिश्रणात थोडं - थोडं पाणी घालून भजीसाठीचे बॅटर तयार करून घ्यावे.
४. एका मोठ्या कढईत गरजेनुसार भजी तळण्यासाठी तेल ओतून ते व्यवस्थित गरम करुन घ्यावे. या गरम तेलात तयार भजीच्या बॅटरचे छोटे मध्यम आकाराचे पकोडे तेलात सोडून घ्यावेत.
५. गरम तेलात भजीला खरपूस रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यावी.
गरमागरम अशी कांद्याच्या पातीची चविष्ट, चमचमीत भजी आपण हिरव्या चटणी सोबत आस्वाद घेत घेत देखील मनसोक्तपणे खाऊ शकता.
