Lokmat Sakhi >Food > रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला करा घरच्याघरीच! चमचमीत चवीची मेजवानी - शाही भाजीचा सुगंध दरवळेल घरभर...

रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला करा घरच्याघरीच! चमचमीत चवीची मेजवानी - शाही भाजीचा सुगंध दरवळेल घरभर...

Kaju Masala Recipe : Restaurant Style Cashew Masala Curry : Kaju Masala Recipe at home : How to make Kaju Masala : रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या काजू मसाला भाजीसारखीच चव आणि टेक्स्चर असणारी स्पेशल भाजी करा घरच्याघरीच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2025 13:46 IST2025-09-20T13:27:43+5:302025-09-20T13:46:36+5:30

Kaju Masala Recipe : Restaurant Style Cashew Masala Curry : Kaju Masala Recipe at home : How to make Kaju Masala : रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या काजू मसाला भाजीसारखीच चव आणि टेक्स्चर असणारी स्पेशल भाजी करा घरच्याघरीच...

Kaju Masala Recipe Restaurant Style Cashew Masala Curry Kaju Masala Recipe at home How to make Kaju Masala | रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला करा घरच्याघरीच! चमचमीत चवीची मेजवानी - शाही भाजीचा सुगंध दरवळेल घरभर...

रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला करा घरच्याघरीच! चमचमीत चवीची मेजवानी - शाही भाजीचा सुगंध दरवळेल घरभर...

आपण अनेकदा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर मेन्यूमधील चमचमीत काजू मसाला भाजी नक्कीच ऑर्डर करतो. काजूची शाही चव आणि भाजीच्या ग्रेव्हीतील  मसाल्यांचा खमंग सुगंध यामुळेच ही भाजी चवीला अप्रतिम (How to make Kaju Masala) लागते. रेस्टॉरंटमध्ये मिळणारी क्रीमी, चविष्ट आणि स्पेशल टेस्ट असलेली काजू मसाला भाजी (Kaju Masala Recipe at home) आपण घरच्याघरी देखील तयार करु शकतो. नेहमीच्या ग्रेव्हीच्या त्याच त्या अगदी कॉमन भाज्या करण्यापेक्षा, आपण काहीतरी वेगळं म्हणून ही भाजी करु शकतो(Restaurant Style Cashew Masala Curry).

मस्त चमचमीत, शाही चवीची अशी ही भाजी घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात झटपट तयार करु शकतो. नेहमीच्या गोडधोड पदार्थांमध्ये तर आपण  आवर्जून काजू घालतोच, परंतु काजूची भाजी हा एक वेगळा आणि चमचमीत चवीचा नवीन पदार्थ आहे. रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या काजू मसाला भाजीसारखीच चव आणि टेक्स्चर घरच्या बनवलेल्या भाजीला देण्यासाठी सोपी रेसिपी पाहूयात. रेस्टॉरंटस्टाईल काजू मसाला भाजी घरच्याघरीच कशी तयार करायची ते पाहूयात..  

साहित्य :- 

१. पाणी - गरजेनुसार
२. कांदा - ३ ते ४
३. काजू - २० ते २५
४. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून 
५. तेल - ४ ते ६ टेबलस्पून 
६. जिरे - १ टेबलस्पून 
७. तमालपत्र - २ 
८. दालचिनी - १ छोटा तुकडा
९. हिरवी वेलची - ४ ते ५ 
१०. काळी मोठी वेलची - १ 
११. दगडफूल - १
१२. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून 
१३. टोमॅटो - १ (बारीक चिरलेला) 
१४. मीठ - चवीनुसार
१५. हळद - १/२ टेबलस्पून 
१६. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून 
१७. धणेपूड - १/२ टेबलस्पून 
१८. गरम मसाला - १/२ टेबलस्पून 
१९. साखर - चवीनुसार
२०. फ्रेश क्रीम -१ टेबलस्पून 
२१. कसुरी मेथी - १/२ टेबलस्पून 
२२. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

नवरात्री स्पेशल : पूर्वतयारी न करता, १५ मिनिटांत करा उपवासाचा ढोकळा! पांढराशुभ्र, चव अप्रतिम - करायला सोपी रेसिपी... 


शेवग्याच्या पानांची चटणी म्हणजे सुपरफूड! रोज खा-हाडं होतील मजबूत -स्वस्तात मस्त औषध...

कृती :-

१. गरम पाण्यांत काजू व उभा चिरलेला कांदा घालून ५ मिनिटे उकळवून घ्यावे. मग हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून व्यवस्थित वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 
२. पॅनवर थोडे साजूक तूप घेऊन त्यात वाटीभर काजू घालून ते हलकासा खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्या. तळून घेतलेलं काजू एका बाऊलमध्ये काढून ठेवा. 
३. आता एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात जिरे, तमालपत्र, दालचिनी, हिरवी वेलची, काळी मोठी वेलची, दगडफूल असे खडे मसाले घालावेत. 

आशा भोसलेंना आवडते 'माँ की दाल'! पराठा, भातासोबत खा पोटभर - अस्सल पारंपरिक रेसिपी...    

४. मग यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं - लसूण पेस्ट व चवीनुसार मीठ घालावे. 
५. या मिश्रणात हळद, लाल तिखट मसाला, धणेपूड, गरम मसाला घालावा. या तयार पेस्ट मध्ये थोडे गरम पाणी घालावे. मग यात वाटून घेतलेली काजू व कांद्याची तयार पेस्ट घालावी. हे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावी. 
६. सगळ्यात शेवटी यात चवीनुसार साखर, तळून घेतलेलं काजू, फ्रेश क्रीम, कसुरी मेथी व बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घालावी. 

मस्त हॉटेलस्टाईल चमचमीत, मसालेदार, चटपटीत काजू मसाला खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम रोटी, पराठा किंवा नानसोबत ही भाजी खायला अधिकच चविष्ट लागते.

Web Title: Kaju Masala Recipe Restaurant Style Cashew Masala Curry Kaju Masala Recipe at home How to make Kaju Masala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.