Join us
Daily Top 2Weekly Top 5

कैरीची आंबट-गोड कढी म्हणजे सुख! उन्हाळ्यात करा अस्सल कोकणी मेजवानी कैरीची कढी, सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2026 09:30 IST

Ambat god kadi recipe: Kairichi kadhi kashi banvaychi: पाहूया कोकणी खवय्यांच्या आवडीची ही 'कैरीची कढी'नेमकी कशी बनवायची.

कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो हिरवागार निर्सग, उंच नारळाची झाडे, बागा, गर्द झाडी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरोघरी दरवळणारा कैऱ्यांचा सुगंध.(Ambat god kadi recipe) घामाच्या धारांनी अंगाची लाहीलाही होते, तेव्हा पोटाला थंडावा आणि जिभेला तृप्ती देणारे पदार्थ कोकणी सुगरणींच्या किचनमध्ये तयार होऊ लागतात. कोकणातील खास पदार्थ सोलकढीची चव अनेकांनी चाखली असेलच. पण कधी कैरीची कढी खाल्ली आहे का? (Kairichi kadhi kashi banvaychi)उन्हाळ्यात बाजारात आपल्याला हिरव्यागार कैऱ्या दिसू लागल्या की आपल्याला काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. कैरीपासून फक्त लोणचे, चटणी, मसाला कैरी असे विविध पदार्थ बनवता येत असले तरी कैरीला रोजच्या जेवणात वेगळंच स्थान आहे.(Raw mango kadhi Marathi) कैरीची कढी म्हणजे ओल्या नारळाचं घट्ट दूध, कैरीचा गर आणि गुळाचा गोडवा यांचा अप्रतिम संगम. गरमागरम आंबेमोहर भात आणि त्यावर ही आंबट-गोड कैरीची कढी म्हणजे कोणत्याही पंचपक्वान्नापेक्षा कमी नसते. पाहूया कोकणी खवय्यांच्या आवडीची ही 'कैरीची कढी'नेमकी कशी बनवायची. (Unhalyatil vishesh padarth)

शांत स्वभाव कमजोरी नाही ताकद, ‘या’ ४ गुणांमुळे इंट्रोवर्ट माणसं होतात यशस्वी-जगतात आनंदात

साहित्य

कैरी- १ मोठीओला नारळ- २ वाट्या (किसलेला)गूळ- १ मोठा चमचामीठ- चवीनुसारवाटण- आले-लसूण-हिरवी मिरची पेस्टफोडणीसाठी- तेल, मोहरी, मेथी दाणे, सुकी लाल मिरची, हिंगसजावटीसाठी- कोथिंबीर

कृती 

1. सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून ती वाफेवर उकडून घ्या. यानंतर मिक्सरच्या भांड्यात किसलेला ओला नारळ आणि उकडलेल्या कैरीचा गर एकत्र करा. 

2. वाटणामध्ये ग्लासभर पाणी घालून छान वाटून घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. यात आले-लसूण- मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिसळा. नंतर त्यात गूळ घालून ढवळा. 

3. फोडणीपात्रात तेल गरम करुन त्यात मोहरी, मेथी दाणे आणि सुकी लाल मिरची घालून छान तडतडू द्या. शेवटी हिंग घाला. तयार केलेले कैरी-नारळाचे दूध फोडणीत घाला. 

4. मिश्रण एकजीव होईपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा. वरुन बारीक चिरलेला कोथिंबीर घाला. गरमागरम भातासोबत चटपटीत कैरीच्या कढीचा आस्वाद घ्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tangy and sweet raw mango kadhi: A Konkani summer delight.

Web Summary : Konkan's raw mango kadhi is a refreshing summer dish. Made with coconut milk, raw mango pulp, and jaggery, it's a sweet and tangy delight best enjoyed with hot rice. A simple and delicious Konkani recipe.
टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल