सकाळची वेळ ही प्रत्येक गृहिणीसाठी तारेवरची कसरत असतं. डब्याची घाई, मुलांची तयारी आणि त्यात सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता बनवणे हे एक मोठे आव्हान असते. (Jowar dosa) डोसा हा आपल्या सर्वांचा आवडता पदार्थ, पण तो बनवायचा म्हटलं की डाळ-तांदूळ भिजवणे, वाटणे आणि पीठ आंबवणे ही मोठी प्रक्रिया असते. चवीला अतिशय चविष्ट आणि आरोग्याला वरदान ठरेल असा 'ज्वारी-मसूर डाळीचा इन्स्टंट डोसा' हा आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. (Low calorie breakfast)हा डोसा केवळ चविष्ट नाही तर लो-कॅलरी आणि हाय प्रोटीन असलेला एक नाश्ता आहे. ज्वारी ही पचायला हलकी आणि थंडावा देणारी तर मसूर डाळ प्रथिनांनी समृद्ध आहे. आपल्या वजन कमी करायचे असेल तर हा डोसा नाश्त्यामध्ये उत्तम पर्याय ठरु शकतो. यासाठी आपल्याला वाटण करण्याची गरज आहे, ना पीठ रात्रभर आंबवण्याची. अवघ्या १० मिनिटांत तुम्ही हा कुरकुरीत डोसा तयार करू शकतो. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.
५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल
साहित्य
मसूर डाळ- १ कप टोमॅटो २ मध्यम बारीक चिरलेला कांदा - १/२ कप मिरची पावडर - १ टीस्पून पाणी- १ कप रवा - १ वाटीज्वारीचे पीठ - अर्धा कप किंवा गरजेनुसार मीठ - चवीनुसार चिरलेली कोथिंबीर तेल / तूप डोसे भाजण्यासाठी
कृती
1. सगळ्यात आधी मसूर डाळ स्वच्छ धुवून घ्या. १ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
2. डाळीतील पाणी पू्र्णपणे काढून टाका. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, टोमॅटो घालून त्याची मऊसुत पेस्ट तयार होईपर्यंत वाटून घ्या.
3. तयार झालेल्या पेस्टमध्ये बारीक रवा आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण साधारण १० मिनिटे झाकून ठेवा. ज्यामुळे रवा व्यवस्थित फुगेल.
4. १० मिनिटानंतर मिश्रणात ज्वारीचे पीठ, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून डोशासारखे पातळ पीठ तयार करा.
5. तवा गरम करुन त्याला थोडे तेल लावा. पिठाचा पातळ थर तव्यावर पसरवा. दोन्ही बाजूंनी डोसा गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्या. गरमागरम मसूर डोसा चटणी किंवा सांबारसोबत खा.
Web Summary : Make instant, healthy Jowar-Masoor Dosa in 10 minutes. This low-calorie, high-protein breakfast requires no soaking or fermentation. It’s easy to digest and perfect for weight loss. Here's the recipe.
Web Summary : 10 मिनट में झटपट और हेल्दी ज्वार-मसूर डोसा बनाएं। इस कम कैलोरी, उच्च प्रोटीन नाश्ते को भिगोने या किण्वन की आवश्यकता नहीं है। यह पचाने में आसान और वजन घटाने के लिए बिल्कुल सही है। यहां है रेसिपी।