आपण नेहमीच्या जेवणात चपाती किंवा भाकरी खातो. आपल्यापैकी काहीजणांच्या घरात दररोज भाकरी तर आवर्जून केली जातेच. ज्वारी, नाचणी, बाजरी अशा वेगवेगळ्या धान्यांच्या (Sorghum Millet Roti) पिठापासून भाकऱ्या तयार केल्या जातात. भाजी, पिठलं, रस्सेदार ग्रेव्ही असणाऱ्या भाज्यांसोबत भाकरी खायला अधिकच (Jowar Masala Fulka Roti) चविष्ट लागते. घरोघरी वेगवगेळ्या धान्यांच्या पिठापासून भाकऱ्या केल्या जात असल्या तरी, ज्वारीच्या पिठाची भाकरी ही हमखास प्रत्येक (Jowar Masala Fulka Roti Recipe) घराघरांत केली जातेच. ज्वारीची भाकरी ही आपल्या पारंपरिक आहाराचा (How To Make Jowar Masala Fulka Roti) एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु दररोज त्याच प्रकारे भाकरी करून खाणं कधी कधी कंटाळवाणं वाटू शकतं. अशावेळी त्याच ज्वारीच्या पिठापासून तयार होणाऱ्या भाकरीला थोडा ट्विस्ट देत, ज्वारीच्या पिठाची मऊसूत मसाला फुलका रोटी तयार करु शकतो.
ज्वारीच्या पिठाची मसाला फुलका रोटी हा एक झटपट, पौष्टिक आणि चविष्ट असा प्रकार आपण घरच्याघरी सहज तयार करू शकतो. फायबरयुक्त, ग्लुटेन-फ्री आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठीही ती एक आरोग्यदायी पदार्थ ठरु शकते. सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणासाठी ही रेसिपी एकदम योग्य आणि करायला देखील सोपी आहे.
साहित्य :-
१. पाणी - १ कप २. जिरे - १ टेबलस्पून ३. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार५. ज्वारीचे पीठ - १ कप ६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)७. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून ८. तेल - गरजेनुसार
नॉनस्टिक तवा नसेल तर, नेहमीच्या तव्याला करा इन्स्टंट पद्धतीने नॉनस्टिक! स्वयंपाक होईल झटपट...
दही खाताना ४ नियम विसरु नका, आयुर्वेदिक सल्ला-फायद्याऐवजी होईल कायमचं नुकसान...
कृती :-
१. सगळ्यांतआधी एका भांड्यात पाणी घेऊन, पाण्याला हलकी उकळी येऊ द्यावी. २. या पाण्यांत जिरे, पांढरे तीळ व चवीनुसार मीठ घालावे. पाणी चमच्याच्या मदतीने हलवून मीठ पाण्यांत विरघळवून घ्यावे. ३. पाणी व्यवस्थित गरम झाल्यावर गॅस बंद करून गरम पाण्यात ज्वारीचे पीठ घालावे. पाणी आणि ज्वारीचे पीठ एकत्रित चमच्याने कालवून घ्यावे. ४. आता हे तयार पीठ एका डिशमध्ये काढून नेहमीप्रमाणे व्यवस्थित मळून घ्यावे.
कौतुकानं लोणचं घातलं पण महिनाभरात त्यात अळ्या-बुरशी? आजीच्या ३ पारंपरिक टिप्स-लोणचं टिकेल वर्षभर...
५. थोडेसे तेल घालून पीठ चांगले मऊसूत मळून घ्यावे. ६. मळून घेतलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून थोडेसे ज्वारीचे कोरडे पीठ लावून चपातीप्रमाणे लाटून घ्यावे. ७. गरम तव्यावर हे ज्वारीच्या पिठाचे तयार मसाला फुलके दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे.
ज्वारीच्या पिठाची नेहमीप्रमाणेच भाकरी करण्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आपण ही मस्त मऊसूत अशी मसाला फुलका रोटी घरच्याघरीच झटपट तयार करू शकतो.