Lokmat Sakhi >Food > गूळ-ज्वारीचा केक खाऊन तर पाहा, फक्त १५ मिनिटांत करा मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट केक...

गूळ-ज्वारीचा केक खाऊन तर पाहा, फक्त १५ मिनिटांत करा मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट केक...

Jowar jaggery chocolate cake recipe : healthy chocolate cake with jowar flour : sugar free healthy chocolate cake : विकतपेक्षा भारी आणि पौष्टिक पदार्थांनी तयार केलेला ज्वारी - गुळाचा पौष्टिक केक मुलांना खाऊ म्हणून देऊ शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 18:13 IST2025-09-10T15:10:49+5:302025-09-10T18:13:29+5:30

Jowar jaggery chocolate cake recipe : healthy chocolate cake with jowar flour : sugar free healthy chocolate cake : विकतपेक्षा भारी आणि पौष्टिक पदार्थांनी तयार केलेला ज्वारी - गुळाचा पौष्टिक केक मुलांना खाऊ म्हणून देऊ शकतो.

Jowar jaggery chocolate cake recipe healthy chocolate cake with jowar flour sugar free healthy chocolate cake | गूळ-ज्वारीचा केक खाऊन तर पाहा, फक्त १५ मिनिटांत करा मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट केक...

गूळ-ज्वारीचा केक खाऊन तर पाहा, फक्त १५ मिनिटांत करा मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट केक...

'केक' हा असा पदार्थ आहे की जो घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाचं आवडतो. 'केक' नुसतं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटत. वेगवेगळ्या चवीचे तसेच विविध आकारांचे (Jowar jaggery chocolate cake recipe) एक से बढकर एक केक बाजारांत अगदी सहज विकत मिळतात. परंतु बाहेर विकतचे (healthy chocolate cake with jowar flour) मिळणारे केक चवीला अगदी उत्तम व्हावेत यासाठी त्या अनेक आर्टिफिशियल पदार्थांचा वापर केला जातो. केकवरील क्रीम, रंग, सजावट, डिझाईन यासाठी भरपूर प्रमाणात साखर, वेगवेगळ्या कृत्रिम पदार्थांचा वापर केला जातो(sugar free healthy chocolate cake).

आपल्या आरोग्यासाठी, विशेषतः लहान मुलांसाठी असे आर्टिफिशियल पदार्थ खाणे हानिकारक ठरु शकते. यासाठीच, बाजारांतून विकतचे केक मुलांना खाऊ म्हणून देण्यापेक्षा आपण घरच्याघरीच मुलांसाठी पौष्टिक असा केक झटपट तयार करू शकतो. घरातील सहज उपलब्ध असणाऱ्या पौष्टिक पदार्थांच्या मदतीने आपण ज्वारी - गुळाचा केक पटकन तयार करू शकतो. विकतपेक्षा भारी आणि पौष्टिक पदार्थांनी तयार केलेला ज्वारी - गुळाचा पौष्टिक केक मुलांना खाऊ म्हणून देऊ शकतो. असा हा हेल्दी केक आपण मुलांना पोटभर खायला देऊ शकतो. ज्वारी - गुळाचा पौष्टिक केक घरच्याघरीच तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.    

साहित्य :- 

१. ज्वारीचे पीठ - १ कप 
२. गूळ - १ कप (बारीक किसलेला)
३. कोको पावडर - १/२ कप 
४. तेल - ३ टेबलस्पून 
५. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून 
६. व्हॅनिला इसेन्स - १/२ टेबलस्पून 
७. दूध - १ कप 
८. ड्रायफ्रुटसचे काप - ३ ते ४ टेबलस्पून 

इडली अजिबात फुलत नाही-घट्ट दगडासारखी होते? ‘असे’ घ्या डाळतांदळाचे अचूक प्रमाण-इडली होईल पिसासारखी हलकी...

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये ज्वारीचे पीठ घेऊन त्यात किसलेला गूळ, कोको पावडर, तेल, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स, दूध, ड्रायफ्रुटसचे काप असे सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावे. 
२. बाऊलमधील सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. 

वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करणारे ५ देसी पदार्थ! बॅड कोलेस्टेरॉल राहते कायमचे दूर... 

३. मग छोट्या वाट्या घेऊन त्याला आतून हलकेच बोटाने थोडे तेल लावून घ्यावे. त्यानंतर तयार बॅटर यात ओतून घ्यावे. 
४. आता एक मोठी कढई घेऊन ती झाकून १० ते १५ मिनिटे प्री - हिट करून घ्यावी. त्यानंतर, या कढईत एक छोटे स्टॅन्ड ठेवून त्यावर या वाट्या ठेवून वर झाकण ठेवावे. 
५. २० ते २५ मिनिटे मंद आचेवर केक बेक करून घ्यावा. ओव्हन असल्यास आपण ओव्हनमध्ये देखील केक बेक करु शकता. 

गरमागरम, मऊ, स्पॉंजी केक खाण्यासाठी तयार आहे. ज्वारीचे पीठ, गूळ यापासून तयार केलेला पौष्टिक केक आपण मुलांना बिनधास्तपणे खायला देऊ शकता.


Web Title: Jowar jaggery chocolate cake recipe healthy chocolate cake with jowar flour sugar free healthy chocolate cake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.