Join us  

नाश्त्यासाठी करा ज्वारीच्या पिठाची सुपरस्पाँजी इडली, वेटलाॅससाठी परफेक्ट- रेसिपी एकदम सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 12:17 PM

Jowar Flour Idli Recipe: वेटलॉससाठी तांदूळ असणाऱ्या इडल्या खात नसाल तर या ज्वारीच्या पिठाच्या इडल्या खाऊन पाहा. मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम पदार्थ आहे. (Easy recipe for weight loss diet)

ठळक मुद्देवेटलॉस करणाऱ्या मंडळींना तसेच कोणत्या ना कोणत्या कारणाने तांदळाचं सेवन टाळणाऱ्या व्यक्तींनाही बिंधास्त खाता येईल.

इडली चटणी किंवा इडली सांबार हा पदार्थ नाश्यामध्ये असला की दिवसाची सुरुवातच कशी छान होऊन जाते. अशी ही खूप आवडीची इडली मात्र वेटलॉस करणारी मंडळी खाणं टाळतात. कारण त्यामध्ये असणाऱ्या तांदळामुळे त्यांना वजन वाढण्याची भिती वाटते. एवढ्या एकाच कारणामुळे इडली खाणं टाळत असाल तर आता ही घ्या एक खास रेसिपी (Jowar Flour Idli Recipe). या रेसिपीमध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरणार आहोत (How to make jowar flour idli). त्यामुळे ही इडली सुपरहेल्दी तर होणार आहेच (perfect breakfast menu), पण वेटलॉस करणाऱ्या मंडळींना तसेच कोणत्या ना कोणत्या कारणाने तांदळाचं सेवन टाळणाऱ्या व्यक्तींनाही बिंधास्त खाता येईल. (Easy recipe for weight loss diet)

 

ज्वारीच्या पिठाची इडली करण्याची रेसिपीज्वारीच्या पिठाची इडली कशी करायची, याची रेसिपी sudscooks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

अर्धा कप उडीद डाळ

झाडांची पानं सुकली- पिवळी पडून गळू लागली? रोपांना घाला 'पांढरं' पाणी- पुन्हा होतील हिरवीगार

१ टीस्पून मेथ्या

दिड कप ज्वारीचं पीठ

चवीनुसार मीठ

चहाप्रेमी असाल तर 'हे' बघाच, चक्क फळं टाकून केला चहा- पाहा फळांच्या चहाची व्हायरल रेसिपी 

कृती

१. ज्वारीच्या पिठाची इडली करण्यासाठी सगळ्यात आधी तर उडीद डाळ आणि मेथ्या एका भांड्यात घेऊन २- ३ वेळा धुवून घ्या. 

 

२. त्यानंतर त्यात पाणी टाकून डाळ ४ तास भिजत ठेवा.

३. चार तासानंतर भिजलेली उडीद डाळ, मेथ्या आणि ज्वारीचं पीठ मिक्सरच्या भांड्यात एकत्र करा. त्यात अंदाजानुसार अर्धा ते एक कप पाणी घाला आणि सगळं मिश्रण मिक्सरमधून फेटून घ्या.

या ३ चुकांमुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात केस गळणं कमी करायचं तर....

पाणी घालताना एवढं लक्षात ठेवा की आपल्याला हे पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट करायचं नाही. त्या अंदाजाने पाणी घाला. 

४. आता हे पीठ एक भांड्यात काढा. त्यात गरजेनुसार मीठ घाला आणि त्यावर झाकण ठेवून द्या. ७ ते ८ तास हे मिश्रण फर्मेंट होऊ द्या. त्यानंतर नेहमीप्रमाणे जशा करता तशा या पिठाच्या इडल्या करा. सांबार किंवा चटणीसोबत ही ज्वारीच्या पिठाची इडली छान लागते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती