Join us

घरीच करा गुळाचा मालपुआ, पारंपरिक पाककृती-आजीच्या हाताची चव हवी तर पाहा सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2025 10:06 IST

malpua recipe like grandma’s : easy malpua without sugar: village-style sweet dish: मालपुआ करण्यासाठी साहित्य आणि घटक कोणते लागतील पाहूया.

प्रांत बदलला की, पदार्थांची चव बदलते. भारतातील अनेक राज्यात विविध पदार्थांची चव चाखली जाते त्यातील एक मालपुआ.(Indian traditional recipe)  हा पदार्थ उत्तर भारतातील असला तरी भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी बनवला जातो. महाराष्ट्रासह ओडिशा, बंगाल आणि राजस्थानमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी बनवली जाते. महाराष्ट्रातही सणासुदीच्या काळात किंवा खास प्रसंगी मालपुआ बनवला जातो. (malpua recipe)मालपुआ हा मैद्यापासून, साखरेच्या पाकात भिजवून बनवलेला एक गोड पुऱ्यासारखा पदार्थ आहे.(easy malpua without sugar)  काही ठिकाणी यामध्ये दूध, केळी, सुकामेवा किंवा नारळाचे सारण घालून याची चव वाढवली जाते. हा पदार्थ करण्यासाठी साहित्य आणि घटक कोणते लागतील पाहूया. (authentic Indian jaggery dessert)

फ्रीजमध्ये ठेवलेली कणिक काळी पडते, कडक होते? ४ सोपे उपाय- कणिक राहिल फ्रेश

साहित्य 

गूळ - ७० ग्रॅमगरम पाणी - १४० मिलीगव्हाचे पीठ - ११० ग्रॅमवेलची पूड - चिमूटभर मीठ - चवीनुसार तूप - १ चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये गूळ घेऊन त्यात गरम पाणी घाला. चमच्याच्या मदतीने गूळ पूर्णपणे वितळवून घ्या. 

2. आता एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्या. त्यामध्ये वेलची पूड घाला. चाळणीने गाळून वरुन गुळाचे पाणी घाला. मीठ घालून त्याचे बॅटर तयार करा. बॅटर जास्त पातळ आणि जाडसर नका करु. 

3. त्यानंतर पॅन गरम करुन त्यावर तूप घाला. मालपुआचे बॅटर पसरवून २ ते ३ मिनिटे शिजू द्या. दुसऱ्या बाजूने पलटून पुन्हा २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या. 

4. तयार होईल हेल्दी आणि चविष्ट असा गुळाचा मालपुआ. 

 

टॅग्स :अन्नपाककृती