Join us

इवल्याशा गुळाच्या खड्याचे करा थंडगार सरबत! थकवा जाईल पळून, प्या गूळ सरबत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 15:22 IST

Jaggery Lemonade Recipe : Summer Drink Gulacha Sarbat : How To Make Jaggery Sarbat At Home : उन्हाळ्यात गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतोच सोबतच थकवा दूर होऊन इंस्टंट एनर्जी देखील मिळते...

कडाक्याच्या उन्हाळ्याला आता सुरुवात झालीच आहे. उन्हाळा म्हटलं की, वाढती उष्णता आणि कडकडीत ऊन यामुळे जीवाची काहिली होते. उन्हाळा ऋतू सगळ्यांनाचं नकोसा (Jaggery Lemonade Recipe) वाटतो. अशा या उन्हांत आपण स्वतःला आतून थंडगार ठेवण्यासाठी अनेक पदार्थ खातो. उन्हाळ्यात आपल्याला वरचेवर काही ना काही थंडगार खाण्या- पिण्याची इच्छा होतेच, अशावेळी आपण सरबत, ज्यूस, कोल्ड्रिंक किंवा इतर काही लिक्विड पदार्थ पितो. उन्हाळ्यात (Summer Drink Gulacha Sarbat) शक्यतो बहुतेकांच्या घरात लिंबूपाणी, कैरीचं पन्ह, रोझ सरबत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सरबतांचे प्रिमिक्स हमखास तयार करून ठेवले जातात(How To Make Jaggery Sarbat At Home).

काही थंडगार पिण्याची इच्छा झालीच की, लगेच या तयार सरबतांच्या प्रिमिक्समध्ये फक्त थंडगार पाणी ओतून चमच्याने हलवून प्यायलं की बरं वाटतं... यंदाच्या उन्हाळ्यात याच सरबतांच्या प्रिमिक्स सोबतच आपण गुळाच्या सरबताचे प्रिमिक्स देखील तयार करून ठेवू शकतो. एरवी देखील गूळ खाणे आपल्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय उपयुक्त ठरते. उन्हाळ्यात गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतोच सोबतच थकवा दूर होऊन इंस्टंट एनर्जी देखील मिळते. उन्हाळ्यात गुळाचे सरबत कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात.     

साहित्य :- 

१. गूळ - १/२ कप २. जिरे - १ टेबलस्पून ३. बडीशेप - १ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. काळीमिरी पावडर - १/२ टेबलस्पून ६. लिंबाचा रस - १ ते २ टेबलस्पून ७. पुदिना - ५ ते ६ पानं ८. पाणी - गरजेनुसार ९. सब्जा - १ ते २ टेबलस्पून 

विकतची महागडी आमचूर पावडर नको, फक्त १०० रुपयांत करा वर्षभर टिकणारी आमचूर पावडर, घ्या रेसिपी...

फरसाणची चटणी कधी खाल्ली आहे? ५ मिनिटांत करा फरसाणची कुरकुरीत चटणी-पाहा रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी गूळ चिरुन बारीक करून घ्या. आपण गूळ किसणीने किसू देखील शकता. २. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात किसलेला गूळ, जिरे, बडीशेप, चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, लिंबाचा रस व पुदिन्याची पानं असे सगळे जिन्नस एकत्रित करून घ्यावेत. ३. आता या मिश्रणात थोडे पाणी घालून मिक्सर फिरवून याची पेस्ट तयार करून घ्यावी. ४. तयार पेस्ट मिक्सरच्या भांड्यातून काढून एका काचेच्या बाटलीत भरुन स्टोअर करून ठेवावी. ही बाटली फ्रिजमध्ये ठेवावी. 

आंबा चिरण्याच्या ७ पद्धती, प्रत्येक फोडीप्रमाणे वेगळी लागेल आंब्याची चव! पाहा कशासाठी - कसा चिराल आंबा...

गुळाचे सरबत कसे तयार करायचे ? 

सर्वातआधी एका ग्लासात गुळाच्या सरबताचे तयार प्रिमिक्स चमचाभर घ्यावे. मग यात आपल्या आवडीनुसार भिजवलेल्या सब्जाचे बी घालावे. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून सगळे मिश्रण चमच्याने एकत्रित हलवून घ्यावे. सगळ्यांत शेवटी यात वरून बारीक चिरलेला पुदिना भुरभुरवून घालावा आणि गुळाचे सरबत तयार आहे पिण्यासाठी. यात आपण आपल्या आवडीनुसार बर्फाचे खडे घालूंन पिण्यासाठी सर्व्ह करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल