आंबे - फणस खाण्याच्या सिझनमध्ये आपण या फळांवर अगदी ताव मारून खातो. प्रत्येक घरोघरी मोठ्या प्रमाणावर आंबे - फणस अगदी आवडीने खाल्ले जातात. मोठाला फणस (Healthy Ladoo Recipe) घरी आणून फोडला जातो, मग गोडसर वास दरवळतो, आणि फणसाचे गरे खाल्ल्यावर उरलेल्या बिया स्वच्छ धुवून वाळवून ठेवायच्या. मग या फणसाच्या (Jackfruit Seed Ladoo) बिया डाळीत, भाजीत किंवा वेगवेगळ्या पदार्थात घालून त्या पदार्थांच्या (Jackfruit Seed Laddu) चवीत अधिक भर घालता येते. याचबरोबर, या फणसाच्या आठळ्यांचे वेगवेगळे पदार्थ देखील हमखास तयार केले जातात. या पदार्थांमध्ये, फणसाच्या आठळ्यांचे पौष्टिक लाडू अतिशय चविष्ट आणि लोकप्रिय आहेत(Jackfruit Seeds Laddu Recipe).
घरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांसाठी हे लाडू खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. फणसाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं, आयर्न, फॉलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स ,मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस यांसारखी खनिजद्रव्यं असतात. फणसाच्या आठळ्यांचे लाडू हे फक्त चवीलाच नव्हे, तर आरोग्यालाही फायदेशीर असतात. या लाडूंमध्ये फणसाच्या बियांचे पोषणमूल्य टिकवून ठेवले जाते. फणसाच्या आठळ्यांचे लाडू हा एक पारंपरिक, नैसर्गिक आणि आरोग्यदायी असा उत्तम पदार्थ आहे. फणसाच्या आठळ्यांचे लाडू कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. फणसाच्या बिया - १० ते १२ बिया
२. ओलं खोबरं - १ कप (किसलेलं खोबरं)
३. शेंगदाणे - १ कप (भाजलेले)
४. गूळ - १/२ कप (किसलेलं गूळ)
५. वेलची पूड - १/४ टेबलस्पून
६. साजूक तूप - १ ते २ टेबलस्पून
७. मीठ - चिमूटभर
मस्त मुसळधार पावसात करा पौष्टिक आणि चमचमीत फणसाच्या आठळ्या फ्राय- पारंपरिक टेस्टी पदार्थ...
कृती :-
१. फणसाच्या आठळ्या स्वच्छ धुवून मग ३ ते ४ दिवस व्यवस्थित सुकवून घ्याव्यात.
२. या सुकलेल्या फणसाच्या बियांची सालं काढून घ्यावीत. सालं काढून झाल्यानंतर या फणसाच्या बिया कढईत ओतून त्या कोरड्या भाजून घ्याव्यात. त्याच कढईत थोडे साजूक तूप घालून खोबरं देखील हलकेच भाजून घ्यावे.
३. भाजून घेतलेल्या बिया आणि भाजलेलं खोबरं एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावे.
४. आता मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात भाजून सालं काढून घेतलेल्या फणसाच्या बिया, किसलेलं ओलं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, किसलेला गूळ, वेलची पूड , चिमूटभर मीठ असे सगळे जिन्नस एकत्रित घालून वाटून घ्यावे.
५. मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे.
६. हाताला थोडे तूप लावून तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्यावेत.
फणसाच्या आठळ्यांचे पौष्टिक असे लाडू खाण्यासाठी तयार आहेत. आपण हा पौष्टिक लाडू सकाळच्या नाश्ताला किंवा संध्याकाळचा टी - टाइम स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता.