Lokmat Sakhi >Food > International Tea Day : गरमागरम चहा पिण्याची तलफ आता भागवा कधीही, कुठेही! पाहा २ मिनिटांत ‘चहा’ची भन्नाट आयडिया...

International Tea Day : गरमागरम चहा पिण्याची तलफ आता भागवा कधीही, कुठेही! पाहा २ मिनिटांत ‘चहा’ची भन्नाट आयडिया...

Instant Tea Premix Powder Recipe : How to make homemade tea primix powder at home : Homemade Instant Tea Premix : आपल्याला दिवसांतून अनेकदा चहा पिण्याची इच्छा होते, यासाठी करुन ठेवा फक्कड चवीचे चहा प्रिमिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2025 15:18 IST2025-05-21T15:04:40+5:302025-05-21T15:18:21+5:30

Instant Tea Premix Powder Recipe : How to make homemade tea primix powder at home : Homemade Instant Tea Premix : आपल्याला दिवसांतून अनेकदा चहा पिण्याची इच्छा होते, यासाठी करुन ठेवा फक्कड चवीचे चहा प्रिमिक्स...

International Tea Day Instant Tea Premix Powder Recipe How to make homemade tea primix powder at home Homemade Instant Tea Premix | International Tea Day : गरमागरम चहा पिण्याची तलफ आता भागवा कधीही, कुठेही! पाहा २ मिनिटांत ‘चहा’ची भन्नाट आयडिया...

International Tea Day : गरमागरम चहा पिण्याची तलफ आता भागवा कधीही, कुठेही! पाहा २ मिनिटांत ‘चहा’ची भन्नाट आयडिया...

'चहा' हे असे पेय आहे की आपण ते कधीही आणि कुठेही पिऊ शकतो. बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. सकाळचा गरमागरम वाफाळता चहा जोपर्यंत पीत नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवात झाली आहे असे वाटतच नाही. चहा (Ready To Drink Tea - Just Add Hot Water, Travel Friendly Recipe) केवळ एक पेय नसून अनेक भारतीयांच्या डेली रुटीनचा अविभाज्य भाग आहे. सकाळच्या फ्रेशनेसपासून ते संध्याकाळच्या विश्रांतीपर्यंत, चहा हे एक (Chai Tea Premix Powder Recipe) सवयीच पेय बनले आहे. आता पावसाळ्याला सुरुवात होणारच आहे, मुसळधार पाऊस पडून आजूबाजूला वातावरणात गारवा पसरला की चहाची तलप लागते(International Tea Day).

विशेषतः आपल्याकडे रोजच्या डेली रुटीनच्या गडबडीत, प्रत्येक वेळेस गॅसवर चहा उकळणं शक्य होत नाही. यासाठीच "चहा प्रीमिक्स" हा पर्याय आजच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये अत्यंत उपयुक्त ठरत आहे. चहाची तलप भागवण्यासाठी आता सारखा चहा करत बसायची गरज नाही. आपण चहाचे प्रिमिक्स एकदाच तयार करुन ठेवू शकतो. या प्रिमिक्समध्ये फक्त गरम पाणी घातलं की फक्कड असा चहा तयार.... आपल्याला वारंवार चहा करत बसायला लागू नये किंवा बाहेर कुठे प्रवासात जाताना आपण हे चहाचे प्रिमिक्स वापरुन झटपट इन्स्टंट पद्धतीने चहा करु शकतो.चहा प्रिमिक्स नेमके कसे तयार करावे ते पाहूयात(Homemade Instant Tea Premix).

साहित्य :- 

१. चहा पावडर - १ कप 
२. साखर - १ कप
३. छोटी हिरवी वेलची :- ६ ते ८ वेलची  
४. सुंठ पावडर - १/२ टेबलस्पून
५. मिल्क पावडर - २ कप 

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...


शिळ्या पोळ्या आणि डाळीचे डोसे? विश्वास नाही बसणार पण ‘असे’ डोसे करुन पाहा, कोंड्याचा मांडा...

कृती :- 

सगळ्यांत आधी एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात चहा पावडर, साखर, छोटी हिरवी वेलची, सुंठ पावडर एकत्रित घेऊन मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.
त्यानंतर, तयार झालेले मिश्रण एका बारीक जाळीदार गाळणीतून गाळून घ्यावे. त्यानंतर, मिक्सरमध्ये वाटून तयार केलेलं मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून त्यात मिल्क पावडर मिसळून घ्यावी. चहा प्रिमिक्स तयार आहे, हे चहा प्रिमिक्स आपण एका हवाबंद डब्यांत भरुन स्टोअर करून ठेवू शकतो. 

प्रिमिक्स वापरुन चहा कसा करावा ?

१. हे प्रिमिक्स वापरुन चहा तयार करण्यासाठी एका कपमध्ये आधी १ टेबलस्पून प्रिमिक्स घ्यावे. 
२. त्यानंतर त्यात कपभर गरम पाणी ओतून घ्यावे आणि चमच्याने ढवळून हे प्रिमिक्स त्यात मिक्स करावे. 
३. प्रिमिक्स वापरुन तयार केलेला आपला गरमागरम चहा पिण्यासाठी तयार आहे.


Web Title: International Tea Day Instant Tea Premix Powder Recipe How to make homemade tea primix powder at home Homemade Instant Tea Premix

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.