सकाळ किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला जर गरमागरम आणि कुरकुरीत डोसा असेल, तर पूर्ण दिवस आनंदी जातो. पण रोजचा तोच पांढराशुभ्र डोसा खाऊन कंटाळा आला असेल, तर आपण अगदी झटपट होणारा इन्स्टंट टोमॅटोचा डोसा तयार करु शकतो. डोसा हा दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असला, तरी आता तो घरोघरी आवडीने तयार करुन खाल्ला जातो. नेहमीच्या साध्या डोशाला ट्विस्ट देऊन आपण फक्त वाटीभर टोमॅटोचा 'लालचुटुक टोमॅटो डोसा' झटपट तयार करु शकतो. टोमॅटोचा आंबट-गोड स्वाद, मसाल्यांचा हलका तिखटपणा आणि बाहेरून कुरकुरीत यामुळे हा डोसा घरांतील प्रत्येकालाच आवडतो(how to make tomato dosa at home).
टोमॅटोचा नैसर्गिक आंबट-गोडपणा आणि डोशाचा कुरकुरीतपणा यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच यावर ताव मारतील. हा डोसा केवळ दिसायलाच लालचुटुक आणि सुंदर दिसत नाही, तर त्याची चवही अप्रतिमच लागते. सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचीछोटीशी भूक, हा टोमॅटो डोसा लगेचच मूड फ्रेश करतो आणि पोट देखील भरते. कमी वेळात तयार होणारी आणि चवीला जबरदस्त अशी ही रेसिपी नक्कीच सगळ्यांना आवडेल. कुरकुरीत आणि रंगानेही आकर्षक असा 'टोमॅटो डोसा' कसा (Instant tomato dosa recipe) तयार करायचा याची साधीसुधी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. टोमॅटो - २ ते ३ (मध्यम आकाराचे तुकडे केलेले)२. आलं - १ ते २ छोटे तुकडे३. लाल सुक्या मिरच्या - २ ते ३ ४. बारीक रवा - १/२ कप ५. गव्हाचे पीठ - १/२ कप ६. तांदुळाचे पीठ - १/२ कप ७. मीठ - चवीनुसार८. जिरे - १ टेबलस्पून ९. कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला)१०. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)११. पाणी - गरजेनुसार१२. तेल - गरजेनुसार
अस्सल खान्देशी उडीद वडे, चव झणझणीत अशी की खाताच म्हणाल वाढा आणखी! पारंपरिक चवीचा बेत...
कृती :-
१. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात मध्यम आकाराचे तुकडे केलेले टोमॅटो, आलं, लाल सुक्या मिरच्या, बारीक रवा, गव्हाचे पीठ, तांदुळाचे पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून एकत्रित असे सगळे जिन्नस वाटून घ्यावे. २. मिक्सरमध्ये असे सगळे जिन्नस एकत्रित वाटून घेतल्यानंतर त्याची पेस्ट तयार करा, गरजेनुसार पाणी घालून पीठ थोडे पातळ करुन घ्या. ३. या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, जिरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण चमच्याने हलवून व्यवस्थित कालवून घ्यावे.
४. एक पॅन व्यवस्थित गरम करून त्याला थोडे तेल लावून घ्यावे. मग तयार बॅटर गरम पॅनमध्ये गोलाकार पद्धतीने सोडून डोसा तयार करुन घ्यावा. ५. डोसा दोन्ही बाजूने खरपूस व हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यावा.
कुरकुरीत आणि टोमॅटोचा आंबट - गोडपणा असलेला असा लालचुटुक डोसा चटणी किंवा सॉस सोबत खायला अधिकच टेस्टी लागतो.
Web Summary : Tired of regular dosa? Try this instant tomato dosa! It's tangy, spicy, crispy, and loved by all. This recipe uses tomatoes, spices, and flours for a quick, flavorful breakfast or snack. Ready in minutes!
Web Summary : सादे डोसे से ऊब गए हैं? इस झटपट टमाटर डोसे को आजमाएं! यह खट्टा, मसालेदार, कुरकुरा और सभी को पसंद आता है। यह रेसिपी टमाटर, मसाले और आटे का उपयोग करके जल्दी से बनने वाला स्वादिष्ट नाश्ता या स्नैक है। मिनटों में तैयार!