Lokmat Sakhi >Food > कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल!

कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल!

Instant Fennel Seeds & Mishri Sharbat Premix Powder : Saunf & Mishri sharbat premix recipe : Badishep ani khadisakhrech sarbat recipe : बडीशेप - खडीसाखर आपण फक्त मुखवास म्हणून खातो, परंतु यंदाच्या उन्हाळ्यात प्या शरीराला थंडावा देणारं बडीशेप - खडीसाखरेचं सरबतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2025 15:59 IST2025-03-05T15:44:09+5:302025-03-05T15:59:28+5:30

Instant Fennel Seeds & Mishri Sharbat Premix Powder : Saunf & Mishri sharbat premix recipe : Badishep ani khadisakhrech sarbat recipe : बडीशेप - खडीसाखर आपण फक्त मुखवास म्हणून खातो, परंतु यंदाच्या उन्हाळ्यात प्या शरीराला थंडावा देणारं बडीशेप - खडीसाखरेचं सरबतं...

Instant Fennel Seeds & Mishri Sharbat Premix Powder Saunf & Mishri sharbat premix recipe Badishep ani khadisakhrech sarbat recipe | कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल!

कुल है बाॅस! चमचाभर बडीशेप-चिमूटभर खडीसाखरेचं सरबत प्या, उन्हाळा एकदम गारेगार होऊन जाईल!

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. उन्हाळा ऋतू सगळ्यांनाचं नकोसा वाटतो. वाढत्या उन्हामुळे आपल्याला सतत काही ना काही थंडगार प्यावेसे वाटते.  अशावेळी आपण कोल्डड्रिंक, आईस्क्रीम, सरबत असे वेगवेगळ्या प्रकारचे थंड पदार्थ खाणे - पिणे पसंत (Instant Fennel Seeds & Mishri Sharbat Premix Powder) करतो. याचप्रमाणे आपण उन्हाळयात (Saunf & Mishri sharbat premix recipe) घरी देखील वेगवेगळ्या प्रकारची घरगुती शीतपेय तयार करून ठेवतो. आवळा - लिंबू सरबत, गुलाबाच्या पाकळ्यांचे सरबत, कैरीच पन्ह असे बरेच प्रकार असतात(Badishep ani khadisakhrech sarbat recipe).

आपण उन्हाळ्यात बाहेरुन कुठूनही फिरुन आलो की आपल्याला उष्णतेमुळे थकवा येतो, दमल्यासारखे होते. अशावेळी हीच घरगुती थंडगार सरबतं आपल्याला पुन्हा ताजेतवाने करण्यास मदत करतात. यासाठीच आपण विशेष करुन उहाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या शरीराला थंडावा देणाऱ्या बडीशेप आणि खडीसाखरेपासून मस्त थंडगार घरगुती सरबतं प्रिमिक्स तयार करून ठेवू शकतो. हे प्रिमिक्स वापरुन आपण अगदी २ मिनिटांत झटपट सरबतं तयार करु शकतो. बडीशेप खडीसाखरेपासून इन्स्टंट तयार करता येणाऱ्या या सरबताची सोपी रेसिपी पाहूयात.  

साहित्य :- 

१. बडीशेप - २ कप 
२. खडीसाखर - २ कप 
३. वेलची पूड - १/४ टेबलस्पून 
४. बर्फाचे खडे - २ ते ३ खडे 
५. लिंबाचा रस - १ टेबलस्पून 
६. लिंबाचे काप - ३ ते ४ कप (पर्यायी, आपल्या आवडीनुसार)
७. सब्जा - १ टेबलस्पून (भिजवून घेतलेला)

वाळवणाचे पदार्थ करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' १० गोष्टी, पदार्थ न फसता-वर्षभर टिकतील चांगले...


फ्रिजसारखं गार होईल माठातलं पाणी, ९ टिप्स-भर उन्हात माठातल्या गारेगार पाण्याला तोड नाही!

कृती :- 

१. सर्वातआधी एका मिक्सर जारमध्ये बडीशेप, खडीसाखर आणि वेलची पूड एकत्रित घेऊन ती मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. 
२. त्यानंतर एक छोटी गाळण घेऊन ही मिक्सर जार मधील बारीक पावडर व्यवस्थित गाळून घ्यावी. 
३. आता ही गाळून घेतलेली तयार बारीक पावडर एका काचेच्या एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवावी.

नाचणी-ओट्सचा ढोकळा, करा झटपट आणि कॅल्शियमही भरपूर-खा पोटभर; वजनही होईल कमी....

 

सरबत तयार करण्यासाठी :- 

१. सर्वात आधी एक ग्लास घेऊन त्यात ही तयार खडीसाखर, बडीशेपची पावडर १ टेबलस्पून इतकी घालावी. 
२. त्यानंतर त्यात बर्फाचे खडे आणि गरजेनुसार पाणी घालावे. 
३. सर्वात शेवटी यात लिंबाचा रस, लिंबाचे काप आणि भिजवलेला सब्जा घालून सगळे जिन्नस चमच्याने हलवून थंडगार सरबत तयार करून घ्यावेत. 

बडीशेप - खडीसाखरेचे इन्स्टंट तयार होणारे सरबत पिण्यासाठी तयार आहे. 

हे सरबत पिण्याचे फायदे :- 

१. बडीशेप :- बडीशेप थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात बडीशेप खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. बडीशेपचे खाल्ल्याने  शरीराला थंडावा मिळतो आणि पोटातील उष्णताही शांत होते. उन्हाळ्यात अनेकदा पचनाच्या समस्या उद्भवतात. अशावेळी जर तुम्ही बडीशेपमध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करण्याचे काम करते. 

२. खडीसाखर :- खडीसाखर ही आपल्या नेहमीच्या रिफाईंड साखरेपेक्षा खूप जास्त पोषक असते. कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. याशिवाय खडीसाखर प्रकृतीसाठी थंड असते. त्यामुळे उन्हाळ्यात खडीसाखर कायम सोबत ठेवावी आणि खावी. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढत नाही.

Web Title: Instant Fennel Seeds & Mishri Sharbat Premix Powder Saunf & Mishri sharbat premix recipe Badishep ani khadisakhrech sarbat recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.