Join us  

तुरीचे वरण खातो पण डोसा? खा तूरडाळीचा पौष्टिक डोसा - पीठ न आंबवता करा झ्टपट डोसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2024 10:56 AM

Instant Crispy Toor Dal Dosa/ Breakfast Recipes : वरण-खिचडी नेहमीची, विकेंडला करून खा कुरकुरीत तूर डाळीचा पौष्टीक डोसा

सकाळी सकाळी मनासारखं गरमागरम नाश्ता मिळाला, की दिवस तर चांगला जातोच शिवाय काम करण्याची उर्जाही मिळते, वारंवार भूक लागत नाही. बऱ्याचदा नाश्ता स्किप झाल्याने किंवा पौष्टीक घटकांनी परिपूर्ण नाश्ता खायला न मिळाल्याने, लवकर भूक लागते. नाश्त्यामध्ये आपण पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ खातोच. जर याहून काहीतरी हटके खायचं असेल तर, हाय प्रोटीनयुक्त तूर डाळीचा डोसा करून खा (Toor Daal Dosa).

तूर डाळीचा वापर आपण वरण किंवा खिचडी तयार करण्यासाठी करतो. पण याचा वापर आपण कधी डोसा करण्यासाठी करून पाहिलं आहे का? तूर डाळीचा डोसा काही मिनिटात तयार होतो, शिवाय चवीला भन्नाट अशी ही रेसिपी आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते (Cooking Tips and Tricks). तूर डाळीचा कुरकुरीत पौष्टीक डोसा कसा तयार करायचा? पाहा(Instant Crispy Toor Dal Dosa/ Breakfast Recipes).

क्रिस्पी तूर डाळीचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

तूर डाळ

तांदूळ

जिरं

लाल सुक्या मिरच्या

उरलेल्या शिळ्या भाताचा करा मऊ जाळीदार ढोकळा, इन्स्टंट ढोकळा रेसिपी - करा झटपट नाश्ता

काळी मिरी

पाणी

किसलेलं सुकं खोबरं

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप तूर डाळ घ्या. त्यात एक कप तांदूळ, एक चमचा जिरं, ३  ते ४ लाल सुक्या मिरच्या, ४ ते ५ काळी मिरी आणि पाणी घालून साहित्य धुवून घ्या. साहित्य धुवून घेतल्यानंतर त्यात २ कप पाणी घालून त्यावर ५ ते ६ तासांसाठी झाकण ठेवा.

नितीन गडकरींना आवडतो पुण्यातील प्रसिद्ध वडा, स्वतः सांगितली चमचमीत वड्याची सोपी रेसिपी

५ तासानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेलं साहित्य घालून वाटून घ्या. नंतर त्यात एक वाटी किसलेलं ओलं खोबरं घालून पुन्हा वाटून घ्या. वाटलेली गुळगुळीत पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात एक चमचा मीठ घालून मिक्स करा.

दुसरीकडे पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर चमचाभर बॅटर ओतून पसरवा. डोश्याच्या कडेने एक चमचा तेल ओतून पसरवा, व दोन्ही बाजूने डोसा खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे तूर डाळीचा कुरकुरीत डोसा चटणी सोबत खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स