बॉलिवूडच्या फॅशन आणि फिटनेस आयकॉन नीना गुप्ता (Neena Gupta) त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या साध्या आणि पारंपरिक लाईफस्टाईलसाठीही ओळखल्या जातात. त्यांनी अनेकदा त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरून त्यांच्या आवडत्या पदार्थांच्या रेसिपीज चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. नीना गुप्ता यांना विशेषतः टोमॅटोची चमचमीत आणि चटकदार चटणी खूप आवडते(tangy tomato chutney recipe by neena gupta)
या चटणीची चव फक्त तोंडाला पाणी आणणारी नसून, ती जेवणाची चवही अनेक पटींनी वाढवते. साधे जेवण असो वा काही खास बेत, नीना गुप्ता यांची ही टोमॅटो चटणी प्रत्येक पदार्थाला एक अप्रतिम चव देते. ही चटणी तयार करायला खूप सोपी असून ती तुम्ही अनेक दिवस स्टोअर देखील करून ठेवू शकता. इतकच नाही तर ही टोमॅटोची चटणी वर्षभरात कोणत्याही ऋतूंत खाण्यासाठी योग्य असते. टोमॅटोची ही चटणी जेवणाची चव वाढवण्यासोबतच शरीराला आवश्यक असे पोषक घटक देखील पुरवतात, त्यामुळे ही चटणी जिभेचे चोचले पुरवण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने खाणे देखील फायदेशीर असते. नीना गुप्ता यांची स्पेशल रेसिपी असलेली फेव्हरेट टोमॅटो चटणी दिसायला एकदम लालभडक आणि खायला झणझणीत! घरच्याघरीच सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून ही चटणी झटपट कशी करायची ते पाहूयात...
नीना गुप्तांची फेव्हरेट टोमॅटो चटणी रेसिपी...
नीना गुप्तांना आवडते तशी टोमॅटोची चटणी करण्यासाठी आपल्याला २ ते ३ मस्त रसरशीत ताजे लालचुटुक पिकलेले टोमॅटो लागतील. यासोबतच २ ते ३ हिरव्या मिरच्या, प्रत्येकी १ टेबलस्पून तेल, आलं (किसलेलं), लसूण (किसलेला), १ टेबलस्पून कोथिंबीर, ग्लासभर पाणी आणि चवीनुसार मीठ इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
कृती :-
१. एका भांड्यात थोडे पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळवून घ्यावे. २. मग उकळत्या पाण्यांत टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घालून ३ ते ५ मिनिटे व्यवस्थित पाण्यांत उकळवून घ्यावे. ३. मग उकळवून घेतलेले टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून त्याची थोडी जाडसर पेस्ट तयार करून घ्यावी. ४. मग एका भांड्यात थोडे तेल घेऊन ते गरम करावे. गरम तेलात किसलेला लसूण आणि आलं घालावं.
ना साय फेटण्याची झंझट, ना लोणी कढवण्याचे टेंन्शन! फक्त एका ट्रिकने होईल घट्ट - रवाळ साजूक तूप...
५. त्यानंतर यात टोमॅटोची वाटून घेतलेली पेस्ट घालावी सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. मग यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. ६. सगळ्यांत शेवटी चटणीत चवीनुसार थोडे मीठ घालावे. हलकेच एक उकळी येऊ द्यावी.
मस्त झटपट कमी साहित्यात होणारी चटपटीत, चमचमीत टोमॅटोची चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी आपण एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये स्टोअर देखील करु शकता. या चटणीची चव इतकी अप्रतिम लागते की, डोसा, इडली, मेदू वडा, पास्ता यांसारख्या वेगवेगळ्या पदार्थांसोबत तोंडी लावायला म्हणून खाऊ शकता. या चटणीची चवच इतकी अप्रतिम लागते की ही चटणी ज्या पदार्थांसोबत खाल्ली जाते त्या पदार्थाची चव हमखास दुपटीने अधिक चविष्ट लागतेच.
Web Summary : Neena Gupta shares her cherished tomato chutney recipe. Easy to make and store, this tangy condiment enhances any meal, offering both delicious taste and nutritional benefits. Ready in minutes!
Web Summary : नीना गुप्ता ने अपनी पसंदीदा टमाटर की चटनी की रेसिपी साझा की है। बनाने और स्टोर करने में आसान, यह चटपटी चटनी किसी भी भोजन को बढ़ाती है, जो स्वादिष्ट स्वाद और पोषण दोनों प्रदान करती है। मिनटों में तैयार!