आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या अंगणात तुळशीचे रोप असतेच. तुळशीच्या रोपाला आपल्याकडे फार महत्वाचे रोप मानले जाते. तुळस ही धार्मिक महत्व आणि (how to use dry basil plant branch to make chai masala powder) औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले रोप आहे. तुळशीच्या रोपांच्या मुळांपासून ते पानांपर्यंत प्रत्येक भाग हा उपयोगी आणि अनेक महत्वाच्या गुणधर्मांनीयुक्त असा असतो. शक्यतो तुळशीच्या पानांचा (tulsi ki lakdi chai masala recipe) वापर आपण चहा किंवा काढ्यात करतो, पण अनेकदा रोपाची वाढ झाल्यावर त्याच्या जुन्या आणि सुकलेल्या फांद्या आपण निरुपयोगी समजून फेकून देतो. परंतु या रोपांच्या सुकलेल्या फांद्यांमध्ये तुळशीचा सुगंध आणि तिचे सर्व औषधी गुणधर्म अगदी जसेच्या तसेच टिकून राहतात(how to use dry tulsi branches for making tea masala).
तुळशीच्या रोपाच्या फांद्या फेकून न देता, आपण त्यांचा उपयोग करुन एकदम घरगुती व नैसर्गिक असा 'चहा मसाला' तयार करु शकतो. हा चहा मसाला तुमच्या चहाला फक्त एक वेगळी चव देत नाही, तर तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला देखील अधिक बळकट करण्यास फायदेशीर ठरतो. तुळशीच्या सुकलेल्या फांद्यांचा वापर करून चहा मसाला तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
तुळशीच्या सुकलेल्या फांद्यांपासून चहा मसाला कसा करायचा....
१. जर तुमचे तुळशीचे रोप सुकले असेल, तर त्याच्या सुकलेल्या फांद्या रोपांपासून वेगळ्या करा. रोपाच्या फांद्यांना माती किंवा धूळ लागलेली असणार, त्यामुळे त्या चांगल्या प्रकारे धुवून घ्या. धुतल्यानंतर, या फांद्या कडक होईपर्यंत त्यांना प्रखर सूर्यप्रकाशात वाळवा. कारण, त्यांचा चहा मसाला तयार करण्यासाठी फांद्या पूर्णपणे वाळून कोरड्या असणे खूप महत्त्वाचे आहे.
तेलाचा थेंबही न वापरता करा परफेक्ट कुरकुरीत डोसा ! उडप्याचे खास सिक्रेट - सुपर क्रिस्पी डोसा तयार...
२. या सुकलेल्या फांद्यांना थेट मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड करणे कठीण जाऊ शकते, म्हणून आधी त्यांना खलबत्त्यात टाकून जाडसर कुटून घ्या. कुटल्यानंतर, ते मिक्सर ग्राइंडरमध्ये घालून पूर्णपणे वाटून त्याची बारीक पूड तयार करून घ्या आणि नंतर बारीक चाळणीने चाळून घ्या.
३. आता तुळशीच्या सुकलेल्या फांद्यांना दळल्यानंतर जी जाडसर पावडर तयार होईल, त्यात २ ते ३ चमचे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या मिसळा. याच मिश्रणात लवंग, वेलची, बडीशेप आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा घाला. त्याचबरोबर ज्येष्ठमधाचा देखील एक तुकडा घाला. त्यानंतर पुन्हा सर्व जिन्नस एकत्रितपणे मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड तयार करुन घ्यावी, तुमचा चहा मसाला पावडर तयार होईल. त्यानंतर बारीक जाळीच्या चाळणीने हा मसाला पुन्हा एकदा चाळून घ्यावा. हाच चहा मसाला तुमच्या चहाची चव अधिक चविष्ट,सुवासिक आणि फक्कड करेल.