हिवाळा सुरु झाला की बाजारात आपल्याला लाल टोमॅटो पाहायला मिळतात. टोमॅटो स्वस्त असल्यामुळे आपण जास्त प्रमाणात विकत घेतो.(How to store tomatoes in winter) पण घरी आणल्यानंतर काही दिवसांतच ते सडायला लागतात, काळे डाग पडतात किंवा बुरशी लागते. असा अनुभव कायमच अनेकांना आला असेल.(Prevent fungus on tomatoes) टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवूनही ते खराब होतात. पण यामागचे खरं कारण चुकीची साठवण, ओलावा आणि हवेशीरपणाचा अभाव. (Keep tomatoes fresh without fridge)
टोमॅटो हा आपल्या रोजच्या जेवणात केवळ चवीसाठी वापरला जाणारा पदार्थ नाही तर आमटी, भाजी, उसळ, कोशिंबीर, सूप किंवा चटणी अशा अनेक पदार्थांमध्ये टोमॅटो आवर्जून वापरला जातो. (Tomatoes turning black) याचा वापर केल्याने पदार्थाची चव देखील वाढते आणि आरोग्याला पोषण देखील मिळते. पण हा टोमॅटो लवकर खराब होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी पाहूया. (Tomato preservation at home)
1. आपण टोमॅटो विकत आणल्यानंतर सरळ धुवून ठेवतो. पण यामुळे सालीवर ओलावा तसाच राहतो आणि हा ओलावा बुरशी वाढण्यास कारणीभूत ठरतो. टोमॅटो वापरण्याआधी धुवा, साठवताना धुतल्यास लवकर खराब होतात. जर समजा ते ओले असतील तर कोरड्या कापड्याने पुसून घ्या. ज्यामुळे जास्त काळ टिकतील.
2. टोमॅटोचा देठ हा सर्वात नाजूक भाग असतो. हा भाग आधी सडतो आणि तिथूनच बुरशी लागायला सुरुवात होते. त्यामुळे टोमॅटोच्या देठाखालची बाजू वर येईल अशा पद्धतीने, म्हणजे उलटे ठेवून साठवा. यामुळे आत जाणारी हवा कमी होते आणि सडण्याची प्रक्रिया देखील मंदावते. ही सोपी ट्रिक वापरल्याने फ्रीजशिवाय देखील टोमॅटो सहज टिकतील.
3. टोमॅटो साठवताना कधीही बंद डब्यात, प्लास्टिक पिशवीत किंवा एकमेकांवर ढिग करून ठेवू नका. त्याऐवजी टोपली, कागदी पिशवी किंवा ट्रेमध्ये ठेवा. खूप जास्त टोमॅटो असतील, तर दोन थरांमध्ये कागद ठेवा, जेणेकरून ओलावा शोषला जाईल. हवा खेळती राहिल अशा ठिकाणी ठेवल्यास टोमॅटो फ्रेश राहतील. या ३ साध्या ट्रिक्स पाळल्या, तर हिवाळ्यात टोमॅटो काळे न पडता, बुरशी न लागता आणि फ्रीजशिवायही बरेच दिवस फ्रेश राहू शकतात.
