Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्याच्या ३ ट्रिक्स, आंबा रस टिकेल उत्तम आणि हवा तेव्हा खाता येईल...

आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्याच्या ३ ट्रिक्स, आंबा रस टिकेल उत्तम आणि हवा तेव्हा खाता येईल...

How To Preserve Mango Pulp Without Preservatives Or Sugar For A Year : आंब्याची पेटी आणली आणि आंबे एकदम पिकायला लागले की टेंशन येतं कधी खाणार एवढे पटकन, त्यासाठी हा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2023 13:00 IST2023-04-23T13:00:15+5:302023-04-23T13:00:15+5:30

How To Preserve Mango Pulp Without Preservatives Or Sugar For A Year : आंब्याची पेटी आणली आणि आंबे एकदम पिकायला लागले की टेंशन येतं कधी खाणार एवढे पटकन, त्यासाठी हा उपाय...

How to store mango pulp for long time, Frezze mango pulp in long time | आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्याच्या ३ ट्रिक्स, आंबा रस टिकेल उत्तम आणि हवा तेव्हा खाता येईल...

आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्याच्या ३ ट्रिक्स, आंबा रस टिकेल उत्तम आणि हवा तेव्हा खाता येईल...

आंब्याच्या मौसमात आपण आंब्याची पेटी आणतो. आंबे एकावेळी खूप पिकले तर भराभरा खावे लागतात. महागडे आंबे खराब होऊ नये म्हणून भीती वाटते. त्यामुळे आंबे पिकायला लागले एकदम तरी घाबरु नका. आपण वर्षभर आंबा साठवून ठेवू शकतो. तो कसा साठवायच्या याच्या या ३ ट्रिक्स(How To Preserve Mango Pulp Without Preservatives Or Sugar For A Year).

१. आंब्याचे क्युब (Mango Cubes) :-
आमरस न करता आंब्याचे क्युब करून तुम्ही आंबा टिकवून ठेवू शकता. यासाठी आंब्याच्या फोडी करा. त्यावर अलगद दाब देऊन आंब्याच्या गराचे चौकोनी क्युब करून घ्या. हे क्युब एका भांड्यात जमा करा. एक कप आंब्याचे क्युब असतील तर त्यात एक टेबलस्पून साखर टाका. हे क्युब आता एका झिपलॉक बॅगमध्ये टाका. बॅग पुर्णपणे लॉक करण्याआधी तिच्या एका कोपऱ्यात स्ट्रॉ टाका. स्ट्रॉ ने बॅगमधली सगळी हवा काढून घ्या आणि आता बॅग पुर्णपणे लॉक करा. अशा छोट्या छोट्या प्लॅस्टिक बॅगमध्ये आंब्याचे क्युब भरून ठेवा आणि या सगळ्या बॅग एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून फ्रिजरमध्ये स्टोअर करा.

सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...

२. आंब्याचा रस (Mango Pulp) :-
आंब्याचा रस करा. एक कप रस असेल तर एक टेबलस्पून साखर या हिशोबाने साखर टाकून मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या. पिठीसाखरही घालू शकता. साखरेमुळे आंब्याचा रंग आणि चव जशीच्या तशी राहते. हा रस आता झिपलाॅक बॅगमध्ये भरा. बॅग अगदी काठोकाठ भरू नका. त्यातली हवा काढून घ्या आणि त्यानंतर बॅग पुर्णपणे लॉक करा. या बॅग एअर टाईट डब्यात ठेवा आणि फ्रिजरमध्ये स्टोअर करा.

आंब्याच्या मौसमात आमरस खाण्याची चंगळ, पण घाईच्यावेळी कसा कराल झटपट आमरस?

३. आंब्याचा रस प्रिझर्व्ह करण्याची अजून ,एक पद्धत म्हणजे आंब्याचा रस करून तो बर्फाच्या ट्रेमध्ये टाका. ४ ते ५ तास फ्रिजरमध्ये ठेवल्यानंतर त्याचे क्युब तयार होतील. हे क्युब नंतर काढा आणि ते झिपलॉक बॅगमध्ये टाकून ठेवा. स्ट्राॅच्या मदतीने हवा काढून घ्या आणि त्यानंतर बॅग लॉक करा. ही बॅग एअरटाईट डब्यात ठेवून फ्रिजरमध्ये स्टोअर करा.

लक्षात ठेवा :- 

१. आंबा प्रिझर्व्ह करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत त्याला पाणी कुठेही लागणार नाही, याची काळजी घ्या. त्यामुळे हात, भांडे सगळे अगदी कोरडे हवे. पाण्याचा अंश जरी लागला तरी रस काही दिवसांतच खराब होईल.
२. जेव्हा प्रिझर्व्ह केलेला आंब्याचा रस वापरायला काढाल, तेव्हा जेवढा पाहिजे तेवढाच रस काढा. तो काढतानाही तुमचा हात, चमचा अगदी कोरडे पाहिजे. उरलेला रस पुन्हा लगेचच फ्रिजरमध्ये स्टोअर करून ठेवा.

Web Title: How to store mango pulp for long time, Frezze mango pulp in long time