Lokmat Sakhi >Food > लिंबू स्वस्त झाले, लगेच घ्या आणि 'या' पद्धतीने साठवून ठेवा- महिनाभर राहतील रसरशीत, फ्रेश 

लिंबू स्वस्त झाले, लगेच घ्या आणि 'या' पद्धतीने साठवून ठेवा- महिनाभर राहतील रसरशीत, फ्रेश 

Kitchen Tips: लिंबू जास्तीतजास्त दिवस फ्रेश, रसरशीत ठेवण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात ते पाहून घ्या..(how to keep lemon or Limbu fresh for long?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2025 11:46 IST2025-07-18T11:45:32+5:302025-07-18T11:46:20+5:30

Kitchen Tips: लिंबू जास्तीतजास्त दिवस फ्रेश, रसरशीत ठेवण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात ते पाहून घ्या..(how to keep lemon or Limbu fresh for long?)

how to store lemon for long, how to keep lemon or Limbu fresh for long, how to store lemon properly | लिंबू स्वस्त झाले, लगेच घ्या आणि 'या' पद्धतीने साठवून ठेवा- महिनाभर राहतील रसरशीत, फ्रेश 

लिंबू स्वस्त झाले, लगेच घ्या आणि 'या' पद्धतीने साठवून ठेवा- महिनाभर राहतील रसरशीत, फ्रेश 

Highlightsमहिनाभर तरी त्यांचा रसरशीतपणा कमी होणार नाही..

साधं वरण, भात, तूप आणि त्यावर पिळलेलं लिंबू हा पदार्थ बहुसंख्य मराठी लोकांचा अतिशय आवडीचा... पोहे, साबुदाण्याची खिचडी, मिसळ, पावभाजी अशा पदार्थांवर जेव्हा तुम्ही लिंबू पिळता तेव्हा त्या पदार्थाची चव आणखीनच खुलून येते. कित्येक जणांना तर प्रत्येक भाजीमध्ये लिंबू पिळून खाण्याची सवय असते. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात देऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारं लिंबू जर रोज खाल्लं तर त्यामुळे शरीराला निश्चितच खूप फायदे होतात. त्यामुळे बऱ्याच लाेकांच्या स्वयंपाक घरात लिंबू नेहमीच असतं. आता कधी लिंबू एवढं महाग होऊन जातं की ते घेताना १० वेळा विचार करावा लागतो (how to keep lemon or Limbu fresh for long?). म्हणूनच आता सध्या ते खूप स्वस्त झाले आहेत तर भरपूर प्रमाणात घ्या आणि पुढे सांगितलेल्या पद्धतीने ते साठवून ठेवा (how to store lemon properly).. महिनाभर तरी त्यांचा रसरशीतपणा कमी होणार नाही...(how to store lemon for long?)

 

लिंबू जास्तीतजास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी काय उपाय करावे?

पहिला उपाय

हा उपाय करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी एक काचेची एअरटाईट बरणी घ्या. बरणी थोडी आकाराने मोठी असावी जेणेकरून त्यात बरेच लिंबू मावू शकतील. आता त्या बरणीमध्ये लिंबू भरा आणि मग पाणी घाला.

ना जीम ना डाएट, तारक मेहता-फेम जेठालालले दिड महिन्यात घटवलं १६ किलो वजन-ते कसं?

पाणी आणि लिंबू यांनी भरलेली ही बरणी पक्कं झाकण लावून फ्रिजमध्ये ठेवून द्या. यामुळे लिंबू भरपूर दिवस अगदी ताजे राहतील. त्यांच्यातला रस जराही कमी होणार नाही.

 

दुसरा उपाय 

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला झिपलॉक असणारी एक प्लास्टिकची बॅग लागेल. या बॅगेमध्ये लिंबू भरून घ्या. त्यानंतर पिशवीतली हवा पुर्णपणे काढून टाका आणि मग ही पिशवी फ्रिजमध्ये ठेवून द्या. लिंबू छान टिकतील.

डोकं खूप ठणकतंय? पाण्यात २ पदार्थ मिसळून प्या, काही मिनिटांतच डोकेदुखी गायब

तिसरा उपाय

हा उपाय म्हणजे सगळ्या लिंबांचा रस काढून घेणे आणि तो रस एअरटाईट बरणीमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवून देणे. किंवा लिंबाच्या रसाचे आईस क्यूब बनवूनही तुम्ही ठेवू शकता. 
 

Web Title: how to store lemon for long, how to keep lemon or Limbu fresh for long, how to store lemon properly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.