आपल्यापैकी अनेकांना जेवणात तूप खाण्याची सवय आहे. गरमागरम वरण-भातावर तुपाची धार सोडली जाते. पराठा, चपाती, पोळी किंवा पदार्थांमध्ये तुपाचा हमखास वापर केला जातो. साजूक तूप हा भारतीयांच्या घरातील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ.(homemade ghee storage) तुपाच्या वाढत्या किंमतीमुळे आजही अनेक घरांमध्ये साजूक तूप घरच्याघरी बनवले जाते. घरी ताजे, शुद्ध आणि दाणेदार तूप तयार करण्यासाठी खूप वेळ लागतो पण आठवड्याभरातच त्याचा वास येऊ लागतो. ते खराब होते. अनेकदा तुपात भेसळ असल्यामुळे आपण ते घरीच बनवण्याचे ट्राय करतो. (butter storage tips)इतक्या मेहनतीने घरच्या घरी बनवलेलं ताजं लोणी आणि सुगंधी तूप जर लवकर आंबलं, बुरशी लागली किंवा वास बदलला, तर नक्कीच वाईट वाटतं.(how to store homemade ghee) पण खरं सांगायचं तर तूप-लोणी खराब होण्यामागे बनवण्यापेक्षा साठवण्याची पद्धत जास्त चुकीची असते. योग्य पद्धतीने साठवले तर घरचं तूप-लोणी महिनाभर नव्हे, तर अजूनही जास्त काळ ताजं राहू शकतं.यासाठी काय करायला हवं पाहूया.
केस म्हणजे कोरडं रखरखीत शेपूट दिसतंय? कुंडीतली कोरफड ‘अशी' लावा, केस होतील चमकदार- गळणंही कमी
घरी तयार केलेल्या तूप किंवा लोणीला साठवण्यासाठी आपण कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह वापरत नाही. ओलावा, हवेशी संपर्क, ओल्या चमच्याचा वापर, चुकीचं भांडं किंवा उष्णतेमुळे तूप-लोणी लगेच खराब होऊ शकतं. पावसाळा आणि उष्ण हवामानात याप्रकारची समस्या जास्त दिसते.
तूप साठवण्याची योग्य पद्धत
1. सगळ्यात आधी तूप किंवा लोणी पूर्णपणे थंड झाल्यावरच साठवा. गरम असताना झाकण लावणं टाळा, कारण वाफेमुळे आत ओलावा तयार होतो. तूप साठवण्यासाठी काच किंवा स्टीलच्या कोरड्या आणि स्वच्छ भांड्याचा वापर करा. प्लास्टिकच्या डब्यात तूप साठवू नका.
2. लोणी साठवताना त्याचे छोटे-छोटे भाग करा. रोजच्या वापरासाठी वेगळं भांडं ठेवा. उरलेलं लोणी फ्रीजमध्ये साठवा. तूप नेहमी कोरड्या, थंड आणि अंधाऱ्या जागी ठेवायला हवं. उष्णतेपासून दूर ठेवा. तूप काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा.
3. तुपात सुकवलेली आणि स्वच्छ हळदीचा तुकडा ठेवल्याने ते जास्त काळ टिकतं. तसेच त्याचा सुगंध आणि चवही टिकून राहते.
Web Summary : Homemade ghee and butter spoil quickly due to improper storage, not preparation. Store in dry, airtight glass or steel containers away from heat and moisture. Use a dry spoon. Add turmeric for longer freshness. Refrigerate butter portions to keep them fresh for up to a month.
Web Summary : घर का घी और मक्खन बनाने से नहीं, बल्कि गलत तरीके से स्टोर करने से जल्दी खराब हो जाता है। इसे सूखी, एयरटाइट कांच या स्टील के कंटेनर में गर्मी और नमी से दूर रखें। सूखे चम्मच का प्रयोग करें। अधिक ताजगी के लिए हल्दी डालें। मक्खन को एक महीने तक ताजा रखने के लिए फ्रिज में रखें।