Lokmat Sakhi >Food > कोथिंबीर लवकर खराब होते? 'अशी' ठेवा साठवून; जास्त दिवस राहील एकदम फ्रेश

कोथिंबीर लवकर खराब होते? 'अशी' ठेवा साठवून; जास्त दिवस राहील एकदम फ्रेश

कोथिंबीर खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. पण बऱ्याचदा बाजारातून आणलेली कोथिंबीर लवकर खराब होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:54 IST2025-01-11T13:53:14+5:302025-01-11T13:54:42+5:30

कोथिंबीर खाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात. पण बऱ्याचदा बाजारातून आणलेली कोथिंबीर लवकर खराब होते.

How to store coriander leaves for longer period | कोथिंबीर लवकर खराब होते? 'अशी' ठेवा साठवून; जास्त दिवस राहील एकदम फ्रेश

कोथिंबीर लवकर खराब होते? 'अशी' ठेवा साठवून; जास्त दिवस राहील एकदम फ्रेश

कोथिंबीर अन्न पदार्थांची चव वाढवते. काहींना तर प्रत्येक पदार्थात कोथिंबीर हवीच असते. कोथिंबीर खाण्याचे शरीराला अनेक फायदे देखील होतात. पण बऱ्याचदा बाजारातून आणलेली कोथिंबीर लवकर पिवळी पडते, खराब होते. त्यामुळे फ्रेश ठेवणं आणि जास्त दिवस साठवून ठेवणं थोडं कठीण काम होऊन बसतं. काही सोप्या पद्धतीने आपण कोथिंबीर स्टोर करून ठेवू शकतो. जास्त दिवस ती फ्रेश राहण्यासाठी कशी साठवून ठेवायची हे जाणून घेऊया...

कोथिंबीर जास्त दिवस कशी साठवायची?

फ्रीजरमध्ये ठेवा

कोथिंबीर नीट स्वच्छ करून फ्रीजरमध्ये ठेवल्याने बराच काळ साठवली जाईल. बाजारातून कोथिंबीर आणल्यानंतर ती साफ करा, पाण्याने स्वच्छ धूवून घ्या, नंतर वाळवा आणि फ्रीजरमध्ये एका डब्यात ठेवून द्या. 

टिश्यू पेपर

तुम्ही पेपर टॉवेल म्हणजेच टिश्यू पेपरमध्ये देखील कोथिंबीर ठेवू शकता. यामुळे कोथिंबीर बराच काळ फ्रेश राहील. 

१ ग्लास पाण्यात ठेवा

कोथिंबीरच्या पानांचे देठ एका ग्लास पाण्यात किंवा भांड्यात घाला आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. आता दर २ ते ३ दिवसांनी हे पाणी बदलत राहा. यामुळे कोथिंबीर जास्त वेळ फ्रेश राहण्यास मदत होते.

ऑलिव्ह ऑइलमध्ये ठेवा

कोथिंबीर चांगली धुवून घ्या, चांगली वाळवा. एका भांड्यात ठेवा, त्यावर ऑलिव्ह ऑइल घाला आणि फ्रीजमध्ये ठेवा. अशा प्रकारे, तुम्ही कोथिंबीर बराच काळ फ्रेश ठेवू शकता.
 

Web Title: How to store coriander leaves for longer period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न