Join us
Daily Top 2Weekly Top 5

बटाटा पराठा लाटताना सारण बाहेर येते? शेफ रणवीर ब्रारने दिल्या २ टिप्स; पराठा फुटणार नाही, होईल हॉटेलसारखा परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2026 09:30 IST

how to roll aloo paratha: aloo paratha stuffing tips: restaurant style aloo paratha: बटाटा पराठा एकदम मऊ होण्यासाठी काय करायला हवं?

सकाळच्या नाश्त्याला काय करावं असा प्रश्न कायमच गृहिणींना पडत असतो. पण घरात सकाळी गरमागरम बटाटा पराठ्यांचा बेत असेल तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.(how to roll aloo paratha) बटाटा पराठा हा भारतातील घराघरांत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. गरमागरम पराठा, त्यावर साजूक तूप किंवा लोण्याचा गोळा आणि सोबत दही... हे नाव काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं.(aloo paratha stuffing tips) पण नवख्या लोकांसाठी किंवा अनेक गृहिणींसाठी बटाटा पराठा बनवणं वेळखाऊ काम वाटतं.(restaurant style aloo paratha)पराठा लाटताना अनेकदा सारण बाहेर येते, पराठा फुटतो, तव्यावर टाकताच तुटतो ज्यामुळे सारण देखील बाहेर येऊ लागते. यामुळे चव आणि लूक दोन्ही बिघडते. हॉटेलसारखा चविष्ट आणि परफेक्ट बटाटा पराठा आपल्याला का जमत नाही असा प्रश्न अनेक गृहिणींना सतावत असतो. पण यावर प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांनी काही साध्या व सोप्या टिप्स दिल्या आहेत. ज्या लक्षात ठेवल्या तर पराठ्यातील सारण बाहेर देखील पडणार नाही आणि बटाटा पराठा एकदम मऊ होईल. 

एक पांढरा केस उपटला तर बाकीचे केसही पांढरे व्हायला लागतात? हे खरं की खोटं, पाहा आजीबाईच्या बटव्यातील उपाय

1. बटाटा पराठा तुटण्याचे मुख्य कारण म्हणजे बटाट्यांमधील ओलावा आणि पीठ. जर आपण दोन्ही गोष्टींचे प्रमाण व्यवस्थित ठेवले तर घरच्या घरी एकदम मऊ-मुलायम पराठा बनवू शकतो. हे करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी पीठ घ्यावं लागेल. त्यात थोडे मीठ घाला. पराठा क्रिस्पी होण्यासाठी त्यात बेसनाचे पीठ घाला. वरुन ओवा आणि थोडे तूप घाला. पीठात पाणी घालून ते व्यवस्थित मळून घ्या. मळलेले पीठ हे एकदम मऊसुत असायला हवे. 

2. यानंतर उकडलेले बटाटे किसून घ्या, त्यात किसलेले आले, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, धणेपूड, मीठ, लाल-तिखट, जिरेपूड, बडीशेप आणि आमचूर पावडर घाला. अनेकदा आपण यामध्ये कांदाही घालतो. ज्यामुळे कांदा लगेच पाणी सोडते आणि पराठा फुटतो. जर आपल्याला पराठा लगेच खायचा नसेल तर त्यात कांदे घालू नका. 

3. पराठा लाटण्यापूर्वी आधी पिठाचा गोळा घेऊन त्यात बटाट्याचे सारण भरा आणि हलक्या हाताने पराठा थापा किंवा लाटा. तवा गरम करुन मंद आचेवर पराठा भाजून घ्या. वरुन तूप लावा, तयार होईल खमंग, कुरकुरीत- मऊ बटाट्याचा पराठा..

 

English
हिंदी सारांश
Web Title : Aloo Paratha tearing? Chef Ranveer Brar's tips for perfect paratha.

Web Summary : Chef Ranveer Brar shares tips to prevent aloo paratha from tearing. Proper dough and potato mixture consistency are key. Avoid adding onions if storing, and cook on low heat.
टॅग्स :अन्नपाककृती