Join us  

शेंगदाण्यांमध्ये अळ्या होऊ नयेत म्हणून २ साेपे उपाय, महिनोंमहिने चांगले टिकतील- वासही येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2024 1:08 PM

Kitchen Tips For The Storage Of Peanut: शेंगदाणे (shengdane) आणले की महिनाभरातच त्यात अळ्या होतात. असं तुमचंही होत असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा.

ठळक मुद्देशेंगदाणे भरपूर लागतात म्हणून जास्तीचे आणून ठेवले तर नेमके ते महिनाभरातच खराब होतात. त्यांना जाळी लागून त्यात अळ्या होतात.

शेंगदाणे हा अगदी रोजच्या वापरातला पदार्थ. भाजीमध्ये दाण्याचा कूट तर आपण घालताेच. पण बऱ्याचदा चटणी, आमटी यासाठीही शेंगदाणे वापरतो. शिवाय पोहे, उपमा यांसारख्या पदार्थांमध्ये तर शेंगदाणे हवेच असतात. त्यामुळे शेंगदाणे भरपूर लागतात म्हणून जास्तीचे आणून ठेवले तर नेमके ते महिनाभरातच खराब होतात. त्यांना जाळी लागून त्यात अळ्या होतात. असं अळ्या लागून नुकसान होऊ नये, म्हणून हे काही उपाय करून पाहा (How to save peanuts or shengdane for long time). शेंगदाणे महिनोंमहिने खराब होणार नाहीत. (How to store peanut properly)

शेंगदाण्यांना अळ्या लागू नयेत म्हणून उपाय

 

बाजारातून शेंगदाणे विकत आणले की ते कधीच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तसेच राहू देऊ नका.

लेकीसाठी त्यानं स्वत:ला बदललं! इमरान खान राहतो छोट्याशा प्लॅटमध्ये, बंगला-गाडी विकली कारण..

सगळ्यात आधी प्लास्टिकच्या पिशवीतून शेंगदाणे काढा आणि ते एखाद्या बरणीमध्ये, डब्यात भरून ठेवा. असं केल्यानंतरही जर शेंगदाण्याला अळ्या झाल्याच तर पुढील उपाय करून पाहा.

 

१. शेंगदाणे बाजारातून आणल्यानंतर ते कढईमध्ये टाका आणि थोडेसे गरम करून घ्या. आपण पोहे, उपमा अशा पदार्थांमध्ये कच्चे शेंगदाणेच टाकतो. त्यामुळे शेंगदाणे नेहमी भाजतो तसे खूप जास्त भाजू नका.

बैठ्या कामामुळे हिप्स फॅट, मांडीवरची चरबी वाढली? ३ उपाय- वाढलेली चरबी झरझर उतरेल 

फक्त मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे ठेवून शेंगदाणे गरम करून घ्या. यामुळे शेंगदाण्यातला ओलसरपणा कमी होऊन ते अधिककाळ टिकतात.

 

२. शेंगदाणे महिनोंमहिने चांगले रहावेत, यासाठी मीठाचा वापर करता येतो. यासाठी एक कप पाणी घ्या. त्यात एक ते दिड टेबलस्पून मीठ टाका. मीठ पाण्यात पुर्णपणे विरघळले की हे मिठाचे पाणी शेंगदाण्यांवर शिंपडा.

वेटलॉसपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत सगळंच राहील ठणठणीत- रोज फक्त १ चमचा 'ही' चटणी खा

खूप जास्त पाणी टाकू नका. त्यानंतर अर्धा ते एक मिनिट शेंगदाणे हाताने खालीवर करत रहा, जेणेकरून मीठाचे पाणी शेंगदाण्यांना सगळीकडून लागेल. त्यानंतर हे शेंगदाणे २ दिवस उन्हात वाळू द्या आणि नंतर स्वच्छ काेरड्या डब्यात भरून ठेवा.  

टॅग्स :अन्नकिचन टिप्स