Lokmat Sakhi >Food > काकडी कडू आणि विषारी तर नाही? तपासा ५ गोष्टी झटपट, चिरताना ‘अशी’ घ्या काळजी...

काकडी कडू आणि विषारी तर नाही? तपासा ५ गोष्टी झटपट, चिरताना ‘अशी’ घ्या काळजी...

The Two-Second Trick for Avoiding Bitter Cucumbers : How To Remove Bitterness From Cucumbers : How To Remove Bitterness From Cucumbers : उन्हाळ्यात काकडी हवीच पण ती कडूजहर निघाली तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2025 19:38 IST2025-04-10T19:26:20+5:302025-04-10T19:38:46+5:30

The Two-Second Trick for Avoiding Bitter Cucumbers : How To Remove Bitterness From Cucumbers : How To Remove Bitterness From Cucumbers : उन्हाळ्यात काकडी हवीच पण ती कडूजहर निघाली तर?

How To Remove Bitterness From Cucumbers How To Remove Bitterness From Cucumbers | काकडी कडू आणि विषारी तर नाही? तपासा ५ गोष्टी झटपट, चिरताना ‘अशी’ घ्या काळजी...

काकडी कडू आणि विषारी तर नाही? तपासा ५ गोष्टी झटपट, चिरताना ‘अशी’ घ्या काळजी...

उन्हाळा सुरु झाला की आपण थंडगार आणि पाण्याचे प्रमाण अधिक असणारे पदार्थ जास्त खातो. उन्हाळ्यात आपण कलिंगड, टरबूज, ताडगोळे, काकडी खाण्यावर अधिक भर देतो. यातही, आपण मस्त हिरवीगार काकडी अगदी रोजच्या जेवणात आवर्जून खातो. काकडीची कोशिंबीर किंवा अगदी तिखट - मीठ लावून देखील (How To Remove Bitterness From Cucumbers) मोठ्या आवडीने काकडी खातो. परंतु आपण बाजारात पाहिलेली मस्त हिरवीगार काकडी घरी आणून कापली की ती चवीला कडू लागते. अशी कडू चवीची काकडी खायला नकोशी वाटते(How To Remove Bitterness From Cucumbers).

खरंतर, उन्हाळ्यांत काकडी स्वस्त मिळत असली, तरी अनेकदा काकडीचा वाटा उचलल्यावर दोन चार काकड्या कडवट निघत असल्याचा अनुभव येतो. बाहेरून छान  टप्पोरी, डागविरहित, हिरवी काकडी आतून खराब निघू शकेल याची कल्पनाही करवत नाही. काही जण तर तोंडाची चव बिघडेल म्हणून काकडीची सुरुवातीची चकतीही खाण्यास नकार देतात. यासाठीच, काकडी विकत घेताना काही गोष्टी तपासूनच मग काकडी विकत घेणे योग्य ठरेल. काकडी विकत घेतल्यावर ती आतून कडू लागू नये म्ह्णून खास टिप्स पाहूयात. 

काकडी कडू लागू नये म्हणून विकत घेताना या गोष्टी लक्षात ठेवा... 

१. काकडीची साल तपासा :- काकडी घेताना तिचे साल नीट पाहणे गरजेचे आहे. जर काकडी गडद हिरवी असेल आणि त्यावर थोडासा पिवळसरपणा असेल तर ती काकडी ताजी समजावी आणि चवीला कडू निघणार नाही याची खात्री बाळगावी. कारण हिरव्या सालीच्या काकडी देशी किंवा गावठी काकडी म्हणून ओळखल्या जातात. ती काकडी शक्यतो कडू निघत नाही. 

२. लहान आणि बारीक काकडी निवडा :- काकडी विकत घेताना शक्यतो आकाराने लहान आणि बारीक काकड्या विकत घ्या. आकाराने लहान आणि बारीक काकड्या शक्यतो कडू लागत नाहीत. यात बियांचे प्रमाण देखील फार कमी असते. 

कलिंगड चिरणे म्हणजे किचकट काम? पाहा १ भन्नाट ट्रिक, एक मिनिटात फोडीच फोडी...

३. सरळ आकाराची काकडी घ्या :- काकडी नेहमी सरळ आकाराची आहे की नाही ते तपासून पाहावे. वाकड्या काकड्या घेणं टाळा, कारण आकाराने वाकड्या असणाऱ्या काकड्या या शक्यतो चवीला कडू असतात. 

४. पांढऱ्या रेषा तपासा :- काहीवेळा हिरव्यागार काकडीवर हलक्या उभ्या पांढऱ्या रेषा असतात. अशी पांढऱ्या रेषा असणारी काकडी विकत घेऊ नका कारण या काकड्या आतून चवीला कडू असतात. 

५. काकडी मऊ नसावी :- नेहमी टणक काकडीच विकत घ्यावी. मऊ काकडी आतून चवीला कडू असते. 

उन्हाळा स्पेशल थंडगार - चटपटीत रायत्याचे ७ प्रकार ! जेवण होईल झक्कास - पोटाला मिळेल नैसर्गिक थंडावा....

इतके करूनही काकडी घरी विकत आणल्यावर कडू निघालीच तर ती एका विशिष्ट पद्धतीने कापावी म्हणजे ती चवीला कडू लागत नाही. manjumittal.homehacks या इंस्टाग्राम पेजवरुन काकडी (The Two-Second Trick for Avoiding Bitter Cucumbers) कडू असेल तर ती कापण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. काकडी नेहमी मध्यभागातून दोन सामान तुकडे करून मग लहान तुकड्यात कापावी. या पद्धतीमुळे काकडीचा कडूपणा पूर्णपणे नाहीसा होतो, यामुळे काकडी चवीला कडू लागत नाही.


Web Title: How To Remove Bitterness From Cucumbers How To Remove Bitterness From Cucumbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.