पावसाळ्यात वातावरण दमट आणि ओलसर असते.(Kitchen hacks) त्यामुळे आरोग्यासह खाण्यापिण्याच्या पदार्थांवर देखील त्याचा परिणाम होतो. ओलसरपणामुळे भिंतींचे नुकसान होते तर स्वयंपाकघरातील वस्तू देखील खराब होतात. किचनमध्ये पदार्थ कितीही जपून व्यवस्थित साठवून ठेवले तरीही काही काळाने ते सादळतात किंवा त्यांना लगेच बुरशी लागते.(Keep salt dry naturally) पावसाळ्यात असा अनुभव गृहिणींना नेहमीच येत असतो. किचनमधले अनेक पदार्थ ओलाव्यामुळे खराब होतात, ज्यामुळे फेकण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो.(Damp salt fix at home) मीठ साखरेसारखे पदार्थ आपण स्वयंपाकघरात रोजच वापरतो परंतु, पावसाळ्यात या दोन्ही पदार्थांना वातावरणामुळे ओलसर आणि दमटपणा येतो.(Easy kitchen remedies for salt) ज्यामुळे चिकट होऊन त्यात ओलावा किंवा गुठळ्या तयार होतात. हे दोन्ही पदार्थ रोज वापरण्यातले असल्यामुळे ते टिकवणं देखील तितकेच कठीण. जर आपल्याही मीठात ओलावा- गुठळ्या तयार होत असतील तर ५ सोपे घरगुती उपाय करुन पाहा.(How to prevent salt from getting wet)
पावसाळ्यात पापड सादळतात- चिवडा वातड होतो? ३ टिप्स - सादळण्याची चिंताच सोडा कायमची
1. मीठाला आर्द्रतेपासून वाचवण्याचा सर्वात सोपा प्रभावी मार्ग म्हणजे तांदूळ. मीठाच्या डब्यात तांदळाचे दाणे ठेवा. आपण तांदळाची पुरचुंडी बनवून सुती कपड्यात ठेवू शकतो. तांदूळ हा ओलावा शोषून घेणारा घटक आहे. जो हवेतील ओलावा आकर्षित करतो. ज्यामुळे मीठ कोरडे राहते.
2. कॉफीमुळे मीठ फ्रेश राहते. आपण भाजलेले कॉफी बीन्स किंवा थोडी कॉफी पावडर एका लहान पिशवीत भरुन मीठाच्या डब्यात ठेवा. यामध्ये ओलावा शोषून घेण्याची क्षमता चांगली आहे. याच्या सुगंधामुळे वास देखील येत नाही. यासाठी आपण पावडरऐवजी बीन्सचा वापर करणं केव्ही चांगले.
3. बेकिंग सोडा हा मीठातील ओलावा शोषण्यास मदत करतो. लहान कापसाच्या बॉलमध्ये एक किंवा दोन चमचे बेकिंग सोडा भरा. तो मीठाच्या डब्यात ठेवा. जर हवामान खूप दमट असेल तर दर आठवड्याला हे बदलत राहा.
4. लवंग आणि काळीमिरी हे फक्त मसाले नाहीत तर दमटपणाशी लढण्यास मदत करतात. मिठाच्या डब्यात लवंग किंवा ५ ते ६ काळीमिरी ठेवा. लवंग आणि काळीमिरी दोन्हीमध्ये असणारे गुणधर्म ओलावा शोषण्यास मदत करतात. याचा वासामुळे मुंग्या आणि कीटक देखील दूर राहतात.
5. मीठ नेहमी हवाबंद डब्यात ठेवा. काचेचे किंवा प्लास्टिकचे सील बंद डबे वापरा. मीठाचा डबा स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवा जिथे आर्द्रता कमी आणि सूर्यप्रकाश जास्त असेल. सिंक किंवा खिडकीजवळ ठेवणे टाळा.