Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > कांदा पराठा लाटताना फुटतो- पाणी सुटते? १ खास ट्रिक- १० मिनिटांत टम्म फुगलेला- कुरकुरीत पराठा, सोपी रेसिपी

कांदा पराठा लाटताना फुटतो- पाणी सुटते? १ खास ट्रिक- १० मिनिटांत टम्म फुगलेला- कुरकुरीत पराठा, सोपी रेसिपी

Onion paratha recipe: Perfect onion paratha tips: Crispy paratha recipe: कांदा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2026 09:30 IST2026-02-10T09:30:00+5:302026-02-10T09:30:02+5:30

Onion paratha recipe: Perfect onion paratha tips: Crispy paratha recipe: कांदा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

how to prevent onion paratha from tearing while rolling onion paratha water release problem solution secret trick to make crispy onion paratha at home easy onion paratha recipe in 10 minutes | कांदा पराठा लाटताना फुटतो- पाणी सुटते? १ खास ट्रिक- १० मिनिटांत टम्म फुगलेला- कुरकुरीत पराठा, सोपी रेसिपी

कांदा पराठा लाटताना फुटतो- पाणी सुटते? १ खास ट्रिक- १० मिनिटांत टम्म फुगलेला- कुरकुरीत पराठा, सोपी रेसिपी

सकाळचा नाश्ता असो, मुलांचा शाळेचा डबा किंवा सुट्टीच्या दिवशीचा खास बेत. पराठा हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मनापासून खायला आवडतो. पराठ्याचे विविध प्रकार असले तरी कांदा पराठा हा घराघरात सर्वाधिक पसंती मिळणारा अनेकांच्या आवडीचा प्रकार. कांद्याचा गोडवा आणि मसाल्यांचा चटपटीतपणा यामुळे हा पराठा दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खायला अतिशय चविष्ट लागतो. पण अनेकदा गृहिणींची एकच तक्रार असते. कांदा पाणी सोडतो, ज्यामुळे पराठा लाटताना तो फाटतो किंवा तव्यावर टाकताना तो नीट फुगत नाही. 
जर आपल्यालाही हॉटेलसारखा किंवा ढाब्यावर मिळणारा खमंग- कुरकुरीत पराठा घरी बनवायचा असेल तर काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. कांदा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

फ्लॉवरची भाजी खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा कुरकुरीत गोभी वडा; मुले आवडीने खातील-सोपी रेसिपी

साहित्य 
गव्हाचे पीठ- २ कप 
बेसन- २ टेबलस्पून
तेल- २ टेबलस्पून 
मीठ- चवीनुसार 
उभा पातळ चिरलेला कांदा- २ कप 
कोथिंबीर -१/४ कप 
कसुरी मेथी- २ टेबलस्पून 
बारीक चिरलेली हिरवी मिरची- १ टीस्पून 
मिरची पावडर- १ टीस्पून 
धने पूड- १ टीस्पून 
आमचूर- १ टीस्पून 
चाट मसाला- १/२ टीस्पून 
गरम मसाला- १/४ टीस्पून 
काळे / पांढरे- तीळ 
चिरलेली कोथिंबीर 
गव्हाचे कोरडे पीठ 
 तेल / तूप 
 लोणी 

कृती 

1. सगळ्यात आधी कांदा उभा चिरून घ्या. त्यानंतर एका परातीत गव्हाचे पीठ, बेसनाचे पीठ, तेल आणि चिमूटभर मीठ घालून पीठ मळून घ्या. वरुन पुन्हा तेल घालून पीठ चांगले मऊसुत मळा. 

2. आता फोडणी पात्रात २ चमचे बेसन भाजून घ्या. एका भांड्यात उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर कसुरी मेथी, धने पावडर, आमचूर पावडर, चाट मसाला, गरम मसाला, मिरची पावडर आणि भाजलेले बेसन घालून सर्व एकजीव करा. 

3. आता पिठाचा गोळा घेऊन त्याची चपाती लाटा. दोन चपात्या लाटून झाल्यानंतर एका चपातीवर कांद्याचा तयार मसाला भरा. वरुन दुसरी चपाती झाका. हळूवार वरुन लाटून घ्या. 

4. सुरीच्या मदतीने पराठाच्या तुकडे करा. आता त्याचे रोल करा. तयार गोळा हाताने दाबून घ्या. वरुन गव्हाचे सुके पीठ, कोथिंबीर, तीळ लावून पराठा लाटा. 

5. आता तवा गरम करुन त्यावर तेल किंवा तूप पसरवा. पराठा दोन्ही बाजून तूप लावून भाजा. लोण्याच्या गोळ्यासोबत खा गरमागरम कांदा पराठा. 


Web Title : कुरकुरी प्याज पराठा रेसिपी: आसान, उत्तम परिणाम के लिए त्वरित तरकीब।

Web Summary : इस आसान रेसिपी से घर पर स्वादिष्ट, कुरकुरे प्याज पराठे बनाएं। सरल सुझावों का पालन करके फटने और गीलेपन जैसी सामान्य समस्याओं से बचें। आसान सामग्री और तकनीकों से रेस्तरां जैसे पराठों का आनंद लें।

Web Title : Crispy Onion Paratha Recipe: Easy, quick trick for perfect results.

Web Summary : Make delicious, crispy onion parathas at home with this easy recipe. Avoid common problems like tearing and sogginess by following simple tips. Enjoy restaurant-quality parathas with simple ingredients and techniques.