हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारात रसाळ, टवटवीत संत्र्यांची आवक वाढते. व्हिटॅमिन- सी ने भरपूर असलेली ही संत्री आरोग्यासाठी जितकी फायदेशीर असतात, तितकीच ती चवीलाही गोड असावीत अशी आपली अपेक्षा असते.(Orange fruit buying tips in Marathi) पण, अनेकदा आपण रंगाला भुलून किंवा फळविक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संत्री घरी आणतो आणि ती खाल्ल्यावर कळतं की ती प्रचंड आंबट आहेत किंवा आतून पूर्णपणे कोरडी आहेत. अशा वेळी पैसे तर वाया जातातच, पण संत्री खाण्याचा आनंदही हिरमुसतो.(Santri olkhnyachya 3 sopya tricks)संत्री गोड आहेत की आंबट हे ओळखण्यासाठी ती चाखून पाहण्याची अजिबात गरज नाही. संत्रीच्या बाह्य रूपावरून आणि स्पर्शावरून आपण काही सेकंदात ओळखू शकतो की फळ रसाळ आहे की नाही.(Difference between sweet and sour oranges) जर आपल्यालाही साखरेसारखी गोड आणि रसाने भरलेली संत्री निवडायची असतील, तर खरेदी करताना कोणत्या ३ गोष्टी आवर्जून पाहा.
उन्हाळ्यात फ्रीजचं कूलिंग होत नाहीये? सेटिंगमध्ये करा १ बदल, बर्फ होईल तयार- वीजबिलही येईल कमी
1. संत्री गोड आहे की रसाळ ओळखण्यासाठी आपल्याला संत्रं हातात घ्यावं लागेल. त्याच्या आकाराच्या तुलनेत ते जड असायला हवं. संत्री जर हलके असेल तर त्यातील रस सुकला किंवा ते आतून कोरडे आहे. जे फळ वजनाला जड असते, त्याच रसाचे प्रमाण भरपूर असते.
2. संत्र्याची साल बघून आपण त्याच्या चवीचा अंदाज लावू शकतो. आपण नेहमी अशा संत्रीची निवड करायला हवी ज्याची साल पातळ आणि गुळगुळीत असेल. जाड साल असलेली किंवा खूपच खडबडीत असलेली संत्री अनेकदा चवीला आंबट असते. त्यात रसाचे प्रमाण कमी असते. संत्र्यावर कुठेही डाग किंवा ते दाबलेले नसावे. तसेच खूप कडक किंवा अतिशय मऊ संत्री खरेदी करु नका.
3. संत्री खरेदी करताना त्यांचा रंग देखील पाहा. गडद नारंगी रंगाची संत्री निवडा. फिकट पिवळी, हिरवी संत्री अनेकदा कच्ची आणि आंबट असतात. संत्र्याच्या देठावर खड्डा किंवा बटनासारखा भाग असेल तर ती गोड असतात. तसंच संत्रीचा वेगळा सुवास असतो. जर त्याला ताजा गोड सुगंध येत असेल तर ते खाण्यासाठी उत्तम आहे.
Web Summary : Select juicy, sweet oranges by checking weight, skin texture (thin is best), and color (deep orange). Avoid pale, damaged, or very hard fruit for optimal taste.
Web Summary : वज़न, छिलके की बनावट (पतला सबसे अच्छा) और रंग (गहरा नारंगी) देखकर रसीले, मीठे संतरे चुनें। बेहतर स्वाद के लिए फीके, क्षतिग्रस्त या बहुत सख्त फल से बचें।