Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > संत्री गोड आहे की आंबट? खरेदीपूर्वी ३ गोष्टी तपासा, न खाताही सेकंदात ओळखा रसाळ संत्री

संत्री गोड आहे की आंबट? खरेदीपूर्वी ३ गोष्टी तपासा, न खाताही सेकंदात ओळखा रसाळ संत्री

Orange fruit buying tips in Marathi: Santri olkhnyachya 3 sopya tricks: जर आपल्यालाही साखरेसारखी गोड आणि रसाने भरलेली संत्री निवडायची असतील, तर खरेदी करताना कोणत्या ३ गोष्टी आवर्जून पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2026 14:53 IST2026-03-11T14:52:46+5:302026-03-11T14:53:42+5:30

Orange fruit buying tips in Marathi: Santri olkhnyachya 3 sopya tricks: जर आपल्यालाही साखरेसारखी गोड आणि रसाने भरलेली संत्री निवडायची असतील, तर खरेदी करताना कोणत्या ३ गोष्टी आवर्जून पाहा.

How to pick sweet oranges How to tell if an orange is juicy without peeling Santri god ahe ki ambat kase olkhave Rasal santri olkhnyachi trick Santri vikat ghetana kay pahave | संत्री गोड आहे की आंबट? खरेदीपूर्वी ३ गोष्टी तपासा, न खाताही सेकंदात ओळखा रसाळ संत्री

संत्री गोड आहे की आंबट? खरेदीपूर्वी ३ गोष्टी तपासा, न खाताही सेकंदात ओळखा रसाळ संत्री

हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागली की बाजारात रसाळ, टवटवीत संत्र्यांची आवक वाढते. व्हिटॅमिन- सी ने भरपूर असलेली ही संत्री आरोग्यासाठी जितकी फायदेशीर असतात, तितकीच ती चवीलाही गोड असावीत अशी आपली अपेक्षा असते.(Orange fruit buying tips in Marathi) पण, अनेकदा आपण रंगाला भुलून किंवा फळविक्रेत्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संत्री घरी आणतो आणि ती खाल्ल्यावर कळतं की ती प्रचंड आंबट आहेत किंवा आतून पूर्णपणे कोरडी आहेत. अशा वेळी पैसे तर वाया जातातच, पण संत्री खाण्याचा आनंदही हिरमुसतो.(Santri olkhnyachya 3 sopya tricks)
संत्री गोड आहेत की आंबट हे ओळखण्यासाठी ती चाखून पाहण्याची अजिबात गरज नाही. संत्रीच्या बाह्य रूपावरून आणि स्पर्शावरून आपण काही सेकंदात ओळखू शकतो की फळ रसाळ आहे की नाही.(Difference between sweet and sour oranges) जर आपल्यालाही साखरेसारखी गोड आणि रसाने भरलेली संत्री निवडायची असतील, तर खरेदी करताना कोणत्या ३ गोष्टी आवर्जून पाहा. 

उन्हाळ्यात फ्रीजचं कूलिंग होत नाहीये? सेटिंगमध्ये करा १ बदल, बर्फ होईल तयार- वीजबिलही येईल कमी

 

1. संत्री गोड आहे की रसाळ ओळखण्यासाठी आपल्याला संत्रं हातात घ्यावं लागेल. त्याच्या आकाराच्या तुलनेत ते जड असायला हवं. संत्री जर हलके असेल तर त्यातील रस सुकला किंवा ते आतून कोरडे आहे. जे फळ वजनाला जड असते, त्याच रसाचे प्रमाण भरपूर असते.

 

 

2. संत्र्याची साल बघून आपण त्याच्या चवीचा अंदाज लावू शकतो. आपण नेहमी अशा संत्रीची निवड करायला हवी ज्याची साल पातळ आणि गुळगुळीत असेल. जाड साल असलेली किंवा खूपच खडबडीत असलेली संत्री अनेकदा चवीला आंबट असते. त्यात रसाचे प्रमाण कमी असते. संत्र्यावर कुठेही डाग किंवा ते दाबलेले नसावे. तसेच खूप कडक किंवा अतिशय मऊ संत्री खरेदी करु नका. 

3. संत्री खरेदी करताना त्यांचा रंग देखील पाहा. गडद नारंगी रंगाची संत्री निवडा. फिकट पिवळी, हिरवी संत्री अनेकदा कच्ची आणि आंबट असतात. संत्र्याच्या देठावर खड्डा किंवा बटनासारखा भाग असेल तर ती गोड असतात. तसंच संत्रीचा वेगळा सुवास असतो. जर त्याला ताजा गोड सुगंध येत असेल तर ते खाण्यासाठी उत्तम आहे. 
 

Web Title : मीठा या खट्टा संतरा? बेहतरीन चुनने के लिए 3 उपाय

Web Summary : वज़न, छिलके की बनावट (पतला सबसे अच्छा) और रंग (गहरा नारंगी) देखकर रसीले, मीठे संतरे चुनें। बेहतर स्वाद के लिए फीके, क्षतिग्रस्त या बहुत सख्त फल से बचें।

Web Title : Sweet or Sour Orange? 3 Tips to Pick the Best Ones

Web Summary : Select juicy, sweet oranges by checking weight, skin texture (thin is best), and color (deep orange). Avoid pale, damaged, or very hard fruit for optimal taste.