कडाक्याच्या उन्हात शरीराला थंडावा देणारे आणि पाणी पुरवणारे 'खरबूज' हे सर्वांचेच लाडके फळ आहे. बाजारात गेल्यावर पिवळीधमक आणि टपोरी खरबूज पाहून आपण ती आनंदाने घरी आणतो. पण अनेकदा घरी आल्यावर खरबूज कापले की लक्षात येते की ते आतून अगदीच 'फिकं' किंवा चवहीन आहे. बाहेरून सुंदर दिसणारे फळ चवीला गोड असेलच असे नाही, त्यामुळे आपली फसवणूक होते आणि पैसेही वाया जातात. उन्हाळ्यात घामावाटे शरीरातील पाणी कमी होते. खरबूज खाल्ल्याने शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते आणि 'डिहायड्रेशन'चा (Dehydration) त्रास होत नाही. यामुळे थकवा दूर होऊन शरीरात उत्साह टिकून राहतो. खरबुजामध्ये फायबरचे (Fiber) प्रमाण भरपूर असते. उन्हाळ्यात अनेकांना बद्धकोष्ठता (Constipation) किंवा अपचनाचा त्रास होतो. खरबूज खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते.खरबूज न कापता ते आतून मधसारखे गोड आणि रसाळ आहे की नाही, हे ओळखणे ही एक कला आहे. खरबूज निवडताना केवळ त्याचा रंग पाहून चालत नाही, तर त्याचे वजन, सुगंध आणि त्याच्या देठाचा भाग या काही गोष्टी तपासाव्या लागतात. खरबूज खरेदी करताना काय लक्षात ठेवाव पाहूया.
खरबूज खरेदी करताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ते हातात घेऊन त्याचे वजन तपासा. जर दोन सारख्या आकाराची खरबुजे असतील, तर त्यातील जे वजन करायला जास्त जड वाटेल, तेच निवडा. जड खरबूज याचा अर्थ असा की त्यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर आहे आणि ते आतून पूर्णपणे रसाळ (Juicy) आहे. जे खरबूज वजनाला हलके लागते, ते आतून कोरडे किंवा जुने असण्याची शक्यता असते. त्यामुळे 'आकारापेक्षा वजनावर' लक्ष देणे ही पहिली यशस्वी ट्रिक आहे.
खरबूज किती गोड आहे हे त्याच्या सुगंधावरून सहज ओळखता येते. खरबुजाचा जो देठाचा भाग असतो (तिथे नाकाने वास घेऊन पाहा. जर तिथून मधासारखा गोड सुगंध येत असेल, तर खरबूज नैसर्गिकरित्या पूर्ण पिकलेले आणि गोड आहे. जर वासच येत नसेल किंवा खूपच फिका वास असेल, तर ते खरबूज कच्चे असू शकते. पण जर वास थोडा आंबट किंवा कडवटपणा जाणवला, तर याचा अर्थ ते खरबूज अति पिकलेले किंवा खराब झाले असावे.
खरबुजाचा रंग केवळ पिवळा असून चालत नाही. गोड खरबुजावर पिवळ्या किंवा क्रीम रंगाच्या जाळीदार रेषा स्पष्ट आणि उठावदार दिसतात. याला 'नेटिंग' (Netting) म्हणतात. ज्या खरबुजावर ही जाळी दाट असते, ते जास्त गोड असते. तसेच, खरबुजाचा खालचा भाग हलका दाबून पहा. जर तो भाग थोड्या प्रमाणात मऊ (Soft) लागत असेल, तर ते फळ खाण्यासाठी तयार आहे. पण जर तो भाग खूपच कडक असेल, तर ते कच्चे आहे आणि खूप जास्त दबला जात असेल, तर ते आतून सडलेले असू शकते.
Web Summary : Beat the heat with juicy, sweet melon! Don't get fooled by appearances. Check weight, smell the stem for sweetness, and look for prominent netting to pick the best one. Enjoy a refreshing and hydrating summer treat.
Web Summary : गर्मी को मात दें रसीले, मीठे खरबूजे के साथ! दिखावे पर न जाएं। वजन जांचें, मिठास के लिए तने को सूंघें, और बेहतरीन खरबूजा चुनने के लिए प्रमुख जाली देखें। एक ताज़ा और हाइड्रेटिंग गर्मी के इलाज का आनंद लें।