Join us

Tiffin Box Recipe : सकाळचा डबा होईल टेस्टी, करा ढाबा स्टाईल कोल्हापूरी चवीचा अख्खा मसूर- झणझणीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2025 09:35 IST

Tiffin Box Recipe: kids lunchbox idea : dhaba-style Kolhapuri traditional Akha Masoor : सकाळच्या डब्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर भन्नाट पर्याय पहा.

महाराष्ट्रात असे अनेक राज्य आहेत जिथे वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ खाल्ले जातात.(Tiffin Box Recipe) अख्खा मसूर ही खास कोल्हापूरमध्ये बनवली जाणारी डिश आहे.(lunchbox idea) गरमागरम भातासोबत अगदी चवीने अख्खा मसूर खाल्ला जातो. कोल्हापूर, कराड आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असलेली पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी आहे. (Kolhapur traditional recipe)यामध्ये कोल्हापूरी मसाला, कांदा-लसूण मसाला आणि गरम मसाला घालून या पदार्थाची चव वाढवली जाते. घट्ट आणि मसालेदार रस्स्याची तर्री याला येते.(dhaba-style Kolhapuri traditional Akha Masoor ) भाकरी, पोळी किंवा भातासोबत हा पदार्थ खाल्ला जातो. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत अख्खा मसूर आवर्जून बनवला जातो.(Morning dabba recipe) सकाळच्या डब्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर आपण देखील ही भन्नाट रेसिपी ट्राय करुन पाहूया. 

पावसाळ्यात १५ मिनिटांत दही लावण्याची सोपी पद्धत, खास ट्रिक्स- विरजा दाट घट्ट दही

साहित्य 

उकडलेला अख्खा मसूर - १ वाटी तेल - १ मोठा चमचा तूप - १ चमचा लवंग- २ छोटा दालचिनीचा तुकडा - १चक्रीफूल- १ हिरवी मिरची - २ बारीक चिरलेला कांदा - १ टोमॅटो - १ लसूण पाकळ्या - १० ते १२आल्याचा तुकडा कांदा-लसूण मसाला - १ मोठा चमचा एव्हरेस्ट गरम मसाला - १ चमचा हळद - अर्धा चमचा धने जिरे पावडर - १ चमचामीठ - चवीनुसारबारीक चिरलेली कोथिंबीर 

कृती 

1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो, लसूण आणि आल्याचा तुकडा पाणी न घालता पेस्ट तयार करा. 

2. आता त्यानंतर पॅन गरम करुन त्यात तेल आणि तूप घाला. चांगले गरम झाल्यानंतर त्यात लवंग, दालचिनी, चक्रीफूल, हिरवी मिरची आणि कांदा घालून घालून मसाला चांगला तळून घ्या. 

3. कांदा चांगला परतल्यानंतर त्यात तयार पेस्ट घाला. तेलात चांगले परतवून घ्या. 

4. यामध्ये वरील सर्व मसाले घालून तेल सूटेपर्यंत परतवा. उकडून घेतलेला अख्खा मसूर घालून चांगले एकजीव करा. 

5. आता त्यात थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर वरुन कोथिंबीर घाला. 

6. पुन्हा एक उकळी येऊ द्या, तयार झालेला ढाबा स्टाईल अख्खा मसूर गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खा.

 

टॅग्स :अन्नपाककृती