वातावरणातल्या बदलामुळे आपल्यालाही गरमागरम भजी, वडा आणि तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते.(Healthy holiday snack ideas) परंतु, आपल्याला या ऋतूत त्रास होऊ नये याची देखील काळजी घ्यावी लागते.(Green gram vada without oil) बटाटा वडा, मेदूवडा, मुगाच्या डाळीचे वडे, उडीदाच्या डाळीचे वडे इत्यादीची चव आपण हमखास चाखली असेलच. (Vegan moong dal vada)
हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे कधी खाल्ले आहेत का? आतापर्यंत आपण हिरव्या मुगाचे सूप, कबाब, अप्पे, थालीपीठ आणि डोसे खाल्ले असतील.(Easy Indian snack recipes) आपण कधी हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे करुन पाहिले आहेत का? हिरव्या मुगात लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.(Low-calorie festive snacks) ज्यामुळे आरोग्याला विविध पौष्टिक घटत मिळतात. हिरव्या मुगाच्या डाळीचे वडे कसे तयार करायचे? पाहूयात.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी खास खाऊ! गव्हाच्या पिठाची कुरकुरीत मेथी मठरी, भरपूर दिवस टिकेल
साहित्य
सालाची मूग डाळ - १ कप
बारीक रवा - १ चमचा
दही - १ चमचा
आले- मिरची वाटण - १ चमचा
तेल - २ चमचे
चिरलेली कोथिंबीर - १ चमचा
चिरलेला कढीपत्ता - १ चमचा
मीठ - चवीनुसार
मिरपूड - १/४ चमचा
खाण्याचा सोडा - २ चमचा
फोडणीसाठी
तेल- २ चमचा
मोहरी- १/२ चमचा
जिरे १/२ चमचा
हिंग- १/४ चमचा
कढीपत्ता
तीळ- १ चमचा
ओल्या नारळाची चव- २ चमचे
पावभाजी मसाला- १/२ चमचा
मीठ
काश्मिरी मिरची पावडर- १/२ चमचा
पाणी- १/२ कप
लिंबाचा रस- १ चमचा
कोथिंबीर
कृती
1. सगळ्यात आधी हिरव्या मुगाची डाळ धुवून स्वच्छ करुन पाणी काढून घ्या. आता कोरडी होण्यासाठी १० ते १५ मिनिटे सुकवा.
2. कोरडी झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटा. एका भांड्यात काढून त्यात १ कप गरम पाणी घालून १० मिनिटे झाकूण ठेवा.
3. १० मिनिटानंतर डाळ चमच्याने हलवून घ्या. त्यात बारीक रवा घालून पुन्हा चांगली मिक्स करा.
4. त्यात आले-हिरवी मिरची पेस्ट, मीठ, तेल, दही, चिरलेली कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून सगळ साहित्य नीट मिक्स करा. चिमूटभर बेकिंग सोडा घालून चांगले मिसळा.
5. तयार पीठाला वड्यांचा आकार द्या. ग्रीस केलेल्या गाळणीवर किंवा केळीच्या पानावर ठेवा. १५ ते २० मिनिटे वडे वाफवून घ्या.
6. थंड झाल्यानंतर मोहरी -जिऱ्याची वरुन फोडणी द्या. तयार होतील कमी तेलातील कुरकुरीत खमंग मुगाच्या डाळीचे वडे.