सकाळचा नाश्ता हा पोटभरीचा आणि पौष्टिक असला पाहिजे. असे असले तरीही सकाळी कामाच्या घाई - गडबडीत नाश्ता तयार करण्यासाठी तितकासा (Instant Wheat Flour Dosa) वेळ नसतो. कामाची घाई - गडबड, घरातील सगळ्यांचे डबे तयार करणं यात नाश्ता तयार करण्यासाठी फारसा वेळच मिळत नाही. अशावेळी काहीतरी झटपट पण तितकच पौष्टिक आणि हेल्दी असे काही पदार्थ करता यावेत असे वाटते. पटकन अगदी २ मिनिटांत तयार होणारा नाश्ता म्हणजे नूडल्स (Crispy & Healthy Wheat Dosa Recipe) परंतु दररोज असे नूडल्स खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. अशा परिस्थितीत, फक्त २ मिनिटांत तयार होणारे पौष्टिक आणि हेल्दी गव्हाच्या पिठाचे डोसे आपण घरच्याघरीच तयार करु शकतो(How To Make Wheat Flour Dosa At Home).
गव्हाचे पीठ तर सगळ्यांच्याच घरात अगदी सहज उपलब्ध असते. याच कपभर गव्हाच्या पिठाचा वापर करून आपण झटपट तयार होतील असे डोसे पटकन नाश्त्याला करु शकतो. सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी फक्त २ मिनिटांत तयार होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या डोशाची (Instant Wheat Dosa Recipe) रेसिपी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटनवरुन शेअर केली आहे. याच झटपट तयार होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या डोशाची इन्स्टंट रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - १ कप
२. दही - १/४ कप
३. मीठ - १/२ टेबलस्पून
४. साखर - १ टेबलस्पून
५. तेल - गरजेनुसार
६. पाणी - गरजेनुसार
कोकणी पद्धतीने १० मिनिटांत करा मऊ - लुसलुशीत आंबोळी, सकाळचा नाश्ता होईल झक्कास...
फक्त २ मिनिटांत करा मॅगीची भेळ, चहासोबत खाण्यासाठी मस्त चमचमीत पदार्थ, खा मनसोक्त...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका मिक्सरच्या भांड्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात दही, चवीनुसार मीठ व साखर आणि गरजेनुसार पाणी घालावे.
२. आता मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस एकत्रित फिरवून त्याचे बॅटर तयार करून घ्यावे.
३. हे डोसा बॅटर मध्यम कंन्सिस्टंन्सीचे असावे. एकदम पातळ किंवा घट्ट जाडसर करु नये.
४. तयार बॅटर एका मोठ्या बाऊलमध्ये ओतून काढून घ्यावे.
५. आता पॅन गरम करून या पॅनवर थोडे पाणी शिंपडून ते टिश्यू पेपरच्या मदतीने पुसून घ्यावे. जेणेकरुन डोसा तव्याला चिकटणार नाही.
६. आता थोडे तेल पॅनवर सोडून मग हे तयार डोसा बॅटर ओतून गोलाकार आकारात पसरवून डोसा तयार करून घ्यावा.
७. डोसा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावा.
फक्त २ मिनिटांत तयार होणारा क्रिस्पी, कुरकुरीत गव्हाच्या पिठाचा डोसा खाण्यासाठी तयार आहे. हा डोसा आपण हिरवी चटणी, सांबारसोबत खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.