Join us

मैदा नको की विकतचे नको, मुलांसाठी करा गव्हाच्या पिठाचे क्रिस्पी कुकीज- मुलांसाठी खास खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2025 16:59 IST

wheat cookies recipe : healthy whole wheat cookies: cookies at Home: पाहूयात कणकेपासून बाजारात मिळणाऱ्या कुकीजपेक्षा जास्त चविष्ट लागणारे कुकीज घरी कसे तयार करायचे.

सकाळच्या चहासोबत किंवा छोटी भूक लागली की, आपल्यापैकी बरेच जण बिस्किट खातात. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या बिस्किटांची चव आपल्याला चाखायला मिळते.(Cookies recipe in marathi) पण कुकीज, नानकटाई किंवा बिस्किट म्हटलं की, आपल्याला आठवते ती बेकरी.(Homemade cookies) बेकरीमध्ये तयार केलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात मैदा, बेकिंग सोडा, बेकिंग पावडरचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्यासाठी हे चांगले नसते. (cookies for kids)आपल्यापैकी अनेकजण खाण्यापिण्याच्या बाबतीत अगदी तंतोतंत असतात.(Wheat flour cookies) आपल्या शरीराला ग्लुटेन फ्री, फायबर मिळावे म्हणून शक्यत तितक्या प्रमाणात मैद्याचे सेवन कमी करतात.(healthy cookies for kid) पण बरेचदा आपल्याला कुकीज किंवा बिस्किट खाण्याचा मोह आवरत नाही. मुले तर सारखी बिस्किट खाण्यासाठी आपल्यामागे रडरड करतात. बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण कुकीज तयार करु शकतो. पाहूयात कणकेपासून बाजारात मिळणाऱ्या कुकीजपेक्षा जास्त चविष्ट लागणारे कुकीज घरी कसे तयार करायचे. 

४ दिवस टिकणारी खमंग खुसखुशीत मुगडाळ पुरी, नाश्त्यासाठी करा झटपट पदार्थ

साहित्य 

तूप - ५० ग्रॅमपिठीसाखर - १०० ग्रॅमदूध- २० मिली बेकिंग पावडर - १/४ चमचागव्हाचे पीठ - ८० ग्रॅम

कृती

1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये तूप आणि साखर घालून चांगले फेटून घ्या. वरुन दूध घालून पुन्हा एकदा फेटा. 

2. साखर वितळल्यानंतर त्यात बेकिंग पावडर आणि गव्हाचे पीठ घाला. मैदा हवा असल्यास थोडासा घालू शकता. 

3. याची कणिक तयार करुन घ्या. त्यानंतर कुकिंग प्रेसच्या मदतीने त्यात कणीक भरुन कुकीजचा आकार द्या. 

4. बटर पेपरवर कुकीज ठेवून वरुन साखर भुरभुरा. ओव्हनमध्ये १५० डिग्री सेलसिअसवर बेक करा. तयार होईल होममेड पद्धतीचे गव्हाच्या पिठाचे क्रिस्पी कुकीज

 

टॅग्स :अन्नपाककृती