आपल्यापैकी अनेकांच्या घरात नियमित भात खाल्ला जातो. भाताशिवाय जेवणाचे ताट अपूर्णच. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात भाताचे विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात.(masale bhat recipe) बासमती, कोलम, इंडिका, आंबेमोहर असे तांदळाचे विविध प्रकार. यापासून साधा भात, जिरे भात, मसाले भात, लेमन राइस, भाकरी, उकडीचे मोदकसारखे विविध पदार्थ देखील बनवले जातात.(wedding style masale bhat) पण सगळ्यांचा आवडता असणारा मसाले भात घरात फार क्वचित बनतो. लग्न समारंभात तर हा भात आवर्जून असतो. (Indian masala rice recipe)
मसालेभात करताना तो तितका मोकळा, मऊ आणि परफेक्ट होतोच असं नाही. लग्नसमारंभात मसाले भात खाल्ला की अनेकांना तो घरी बनवून खाण्याची इच्छा होते. (Maharashtrian masale bhat) संध्याकाळाच्या जेवणात, विकेंडला किंवा पार्टीचा मेन्यू म्हणून आपण मसालेभात, कोशिंबीर आणि पापड असा मेन्यू ठेवू शकतो. हिवाळ्यात आपल्याला गरमागरम पौष्टिक पदार्थ खायचे असतील तर या पद्धतीचा मसाले भात नक्की ट्राय करुन पाहा.
भुवयांचे केस होतील काळे- घनदाट, आल्याचा सोपा उपाय- महागड्या पार्लरचा खर्च वाचेल, आयब्रो दिसतील सुंदर
साहित्य
बासमती तांदूळ – २०० ग्रॅम
भाज्या – १ कांदा, मटार, गाजर, फ्लॉवर, फरसबी, पनीर, टोमॅटो (प्रत्येकी 2 चमचे)
हिरव्या मिरच्या - २
कढीपत्ता
हळद – ½ टीस्पून
तिखट – 1 टीस्पून
जिरेपूड – ½ टीस्पून
धणेपूड – 1 टीस्पून
गोडा मसाला – 2 टीस्पून
तमालपत्र - ३ ते ४
मोठी वेलची - १
छोटी वेलची - ५
दालचिनी - १ इंच
लवंगा - ४
मिरी - ५
मोहरी – ¼ टीस्पून
जिरे – ¼ टीस्पून
आलं – 1 टीस्पून (कुटलेले)
लसूण – 2 टीस्पून (कुटलेले)
काजू – 1 टेबलस्पून
कोथिंबीर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
तूप - आवश्यकतेनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
साड्या अनेक, ब्लाऊज मात्र एकच! ऑफिस वेअरसाठी पाहा पुढच्या गळ्याच्या ५ स्टायलिश ब्लाऊज डिझाइन्स
कृती
1. सगळ्यात आधी मोठ्या पातेल्यात तूप आणि तेल घाला. त्यानंतर त्यात कढीपत्ता, खडा मसाला, कांदा, गाजर, मटार, फ्लॉवर, फरसबी, आले-लसूण पेस्ट, टोमॅटो, पनीर घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करुन घ्या.
2. आता त्यात भिजवलेले तांदूळ घालून पुन्हा व्यवस्थित परतवून घ्या. वरुन सर्व मसाले घाला. गरम पाणी घालून वरुन मीठ घाला. झाकण झाकून ठेवून भात शिजवण्यासाठी ठेवा.
3. मसाले भात शिजल्यानंतर वरुन कोथिंबीर आणि खोबऱ्याचा किस घालून पसरवा. १५ मिनिटांत तयार होईल गरमा गरम मसाले भात.
