Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > एक थेंब तेल न वापरता करा भरली उकड वांगी! अस्सल गावरान बेत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन तर पाहा...

एक थेंब तेल न वापरता करा भरली उकड वांगी! अस्सल गावरान बेत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन तर पाहा...

How To Make Ukadvangi Recipe : Bharli Ukad Vangi Recipe : तेलाचा थेंबही न वापरता करा भरली उकड वांगी, एकदा चाखून पाहावी अशी चमचमीत चव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 17:35 IST2026-03-04T15:05:11+5:302026-03-04T17:35:17+5:30

How To Make Ukadvangi Recipe : Bharli Ukad Vangi Recipe : तेलाचा थेंबही न वापरता करा भरली उकड वांगी, एकदा चाखून पाहावी अशी चमचमीत चव...

How To Make Ukadvangi Recipe Bharli Ukad Vangi Recipe stuffed steamed Brinjal recipe | एक थेंब तेल न वापरता करा भरली उकड वांगी! अस्सल गावरान बेत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन तर पाहा...

एक थेंब तेल न वापरता करा भरली उकड वांगी! अस्सल गावरान बेत, बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन तर पाहा...

खेडेगावातील त्या मातीच्या चुलीवरचा सुगंध आणि आजीच्या हाताची ती खास चव आठवली की आजही जिभेला पाणी सुटतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वांग्याची भाजी अनेक प्रकारे केली जाते, पण पेठची 'भरली उकड वांगी' ही चव म्हणजे अस्सल गावरान मेजवानीच! तेलाचा तवंग नाही की मसाल्यांचा अतिरेक नाही, तरीही वाफेवर शिजलेल्या वांग्याचा तो मऊपणा आणि मसाल्यांचा खमंगपणा चवीला अप्रतिमच लागतो... वांग्याचा नैसर्गिक गोडवा आणि शेंगदाणा-लसणाच्या वाटपाचा तो तिखटपणा जेव्हा एकत्र येतो, तेव्हा तयार होतो एक असा पदार्थ जो केवळ पोट नाही तर अगदी आवडीचा पदार्थच होऊ जातो...(How To Make Ukadvangi Recipe).

नेहमीच्या भरल्या वांग्यांपेक्षा ही डिश थोडी वेगळी आहे, कारण वांग्यांना उकडून त्यात मसालेदार सारण भरले जाते, ज्यामुळे चव अधिक खुलते. घरगुती मसाले, शेंगदाणे, खोबरे आणि खास ग्रामीण फोडणी यामुळे या भाजीला अप्रतिम सुगंध आणि चव येते. साध्या जेवणातही ही भाजी असेल तर भाकरी किंवा पोळीबरोबर जेवणाची लज्जत दुप्पट होते. आजकाल आपण सर्वजण कमी तेलकट आणि सकस आहार खाणेच पसंत करतो...अशावेळी 'भरली उकड वांगी' हा एक उत्तम पर्याय ठरतो. वांग्याची रस्सा भाजी किंवा भरली वांगी आपण नेहमीच खातो, पण 'उकड' पद्धतीने तयार केलेली ही रेसिपी वांग्याचा नैसर्गिक गोडवा (stuffed steamed Brinjal recipe) आणि मसाल्यांचा खमंगपणा टिकवून ठेवते. गरमागरम बाजरीची भाकरी, सोबत लसणाची चटणी आणि जोडीला पेठची प्रसिद्ध भरली उकड वांगी हा बेत म्हणजे अस्सल गावरान पारंपरिक पदार्थ... अनेकजण वांगी खायला नाक मुरडतात, पण एकदा या पद्धतीने बनवलेली वांगी खाऊन पाहिली की, ती तुमच्या आवडीच्या पदार्थांच्या यादीत नक्कीच वरच्या क्रमांकावर येतील. पेठची प्रसिद्ध भरली उकड वांगी करण्याची गावरान रेसिपी पाहूयात..  

साहित्य :- 

१. वांगी - ४ ते ५ ताजी वांगी
२. सुकं खोबरं - १ कप 
३. शेंगदाणे - १/२ कप 
४. लसूण पाकळ्या - १० ते १२ पाकळ्या
५. कोथिंबीर / कोथिंबिरीचे देठ - १ कप (बारीक चिरलेली)
६. जिरे - १/२ टेबलस्पून
७. हळद - १/२ टेबलस्पून 
८. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
९. मीठ - चवीनुसार
१०. तेल - गरजेनुसार
११. केळीचं पान - १ छोट

शिल्लक राहिलेल्या भाताची करा मऊ - लुसलुशीत, जाळीदार आंबोळी! चवीला जबरदस्त दिसायला पांढरीशुभ्र - पाहा रेसिपी... 


प्रमाण चुकलं की इडली डोसे फसलेच, डाळ तांदळांचं ‘असं’ गणित परफेक्ट- अजिबात विसरु नका प्रमाण...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी वांगी बरोबर मधोमध चिरून चार भाग पडतील अशी कापून घ्यावीत. 
२. मिक्सरच्या एका भांड्यात सुकं खोबरं, शेंगदाणे, लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कोथिंबिरीचे देठ, जिरे, हळद, लाल तिखट मसाला घालूंन मिश्रण एकत्रित जाडसर भरड करून वाटून घ्यावी. तयार मसाला एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. 

कुरमुऱ्याची भेळ नाही करा इन्स्टंट उत्तप्पा! ना पीठ आंबवण्याची कटकट, ना डाळ - तांदूळ वाटण्याची झंझट - चविष्ट रेसिपी...

३. चिरून घेतलेल्या वांग्यांमध्ये हा तयार मसाला भरुन घ्यावा. 
४. मग एखादं छिद्र असलेलं भांडं किंवा चाळणी घेऊन त्यात केळीच पान ठेवून त्यावर ही मसाला भरलेली वांगी ठेवावीत. 
५. आता एका मोठ्या कढईत पाणी घेऊन ते उकळवून घ्यावं. मग या कढईत ही चाळणी ठेवून वरून झाकण ठेवून वांगी वाफेवर उकडवून घ्यावीत. 

वांगी उकडल्यानंतर त्यावर थोडंसं तेल सोडून ही गरमागरम भरली उकड वांगी खाण्यासाठी भाकरीसोबत चवीला अप्रतिम लागतात.

Web Title : भरली उकड़ वांगी रेसिपी: बिना तेल का स्वादिष्ट व्यंजन!

Web Summary : प्रामाणिक गाँव-शैली भरली उकड़ वांगी का आनंद लें, जो बिना तेल के पूरी तरह से भाप में पकाया जाता है। यह स्वादिष्ट व्यंजन मसालों, मूंगफली और नारियल का मिश्रण है, जो पारंपरिक भरवां बैंगन पर एक स्वस्थ और स्वादिष्ट मोड़ प्रदान करता है।

Web Title : Steamed Bharli Vangi Recipe: A Rustic Delight Without Oil!

Web Summary : Enjoy authentic village-style Bharli Ukad Vangi, steamed to perfection without oil. This flavorful dish features a blend of spices, peanuts, and coconut, offering a healthy and delicious twist on traditional stuffed eggplant.