हिवाळा आला की बाजारात हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात पाहायला मिळतात.(Tur dal vada) यातील काही भाज्या अशा असतात ज्या ऋतूनुसार पाहिल्या जातात. मेथी, पालक, गवार, फरसबी, वाल पापडी किंवा तुरीचे दाणे या भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.(Vidarbha special recipe) पण घरातील अनेक मंडळींना भाज्या खायला आवडत नाही.(Traditional dal fritters) लहान मुले तर भाज्या पाहून नाकच मुरडतात. अशावेळी नेमकं काय करावं आपल्यालाही समजत नाही. (winter special reipe)
महाराष्ट्रातील विदर्भ भागात तुरीची भाजी सहज पाहायला मिळते. शेतात पिकवायची आणि ताजी भाजी खायची. ही भाजी येथील खाद्यसंस्कृतीचा एक भागच जणू.(Morning Breakfast recipe) तूरडाळ ही विदर्भाची ओळख. आपल्यापैकी अनेकांना पोळी-भाजी खायला आवडत नाही.(Winter snacks) अशावेळी आपण ही पौष्टिक भाजी मुलांच्या पोटात कशी जाईल याचा विचार करतो. पण तुरीच्या दाण्याचे वडे करुन आपण मुलांना खाऊ घालू शकतो. वडे हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पदार्थ.(Authentic Maharashtra snacks) बटाटा वडा, मेदू वडा, भाजणीचे वडे, उडीदाच्या डाळीचे वडे असे विविध वड्यांची चव चाखली असेलच. विदर्भातील तुरीच्या दाण्याच्या वड्यांची चव चाखू या. हे वडे परफेक्ट बनवण्यासाठी प्रमाण, वाटण्याची पद्धत आणि मसाले यांचं मिश्रण खूप महत्त्वाचं असतं. वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया.
साहित्य
तुरीचे दाणे - १ कप
बेसनाचे पीठ - अर्धा कप
जिरे - १ चमचा
लसूण पाकळ्या - ६ ते ७
आले - १ तुकडा
हिरव्या मिरच्या - ३ ते ४
कढीपत्ता - ४ ते ५ पानं
हळद - १ चमचा
लाल मिरची पावडर - १ चमचा
धणे पावडर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
तेल - तळण्यासाठी
कृती
1. सगळ्यात आधी तुरीचे दाणे व्यवस्थित सोलून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जिरे, लसूण पाकळ्या, आले, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून त्याची पेस्ट तयार करा आणि ताटात काढा.
2. यानंतर मिक्सरच्या भांड्यात तुरीचे दाणे थोडे जाडसर वाटून घ्या. बारीक पेस्ट करु नका. तयार पेस्टमध्ये दाण्याची भरड घालून त्यात हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, मीठ घाला. हळूहळू बेसन पीठ घालून त्याचे पीठ तयार करा. बेसनाचा वापर जास्त प्रमाणात नको.
3. आता वड्याचा पीठाला हातावर थापून मध्यभागी खड्डा करा. कढईवर तेल तापवून घ्या. मंद आचेवर सगळे वडे छान कुरकुरीत तळा. टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.
