हिवाळा म्हणजे थंडी, कोरडे हवामान, तापमानातील चढउतार आणि त्यासोबत येणारे सर्दी-खोकल्याचे त्रास. घराघरात पौष्टिक पदार्थांचा रतीब सुरु होतो. (homemade chyawanprash recipe) लाडू, विविध फळे, खारीक, खोबऱ्यांसह बाजारात गाजर, हरभरे, तुरई, मटार, मुळा, बीट, आवळे यांसारखे विविध पदार्थ पाहायला मिळतात. आवळा हे फळ हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.(traditional chyawanprash recipe) मौसमी असणाऱ्या फळांचे विविध पदार्थ बनवून वर्षभर खाल्ले जातात. (amla chyawanprash at home)
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. जे आरोग्याच्या दृष्टीने वरदान मानलं जातं. यात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम असते.(immune boosting chyawanprash) त्यामुळे आवळ्याचे सेवन केल्यास डोळे, केस, पोट आणि हाडे निरोगी ठेवण्यासाठी आवळा खायला हवा. हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मिळणाऱ्या आवळ्यापासून मुरंबा, लोणचे, कँडी किंवा च्यवनप्राश बनवता येतो. पण संपूर्ण आरोग्याच्या संवर्धनासाठी परिपूर्ण पदार्थ म्हणजे च्यवनप्राश. हे घरच्या घरी कसं बनवायचं यासाठी लागणारे साहित्य कोणते पाहूया.
टोमॅटो काळे पडतात- लवकर सडतात? ५ टिप्स- फ्रीजशिवाय टोमॅटो राहातील खूप दिवस फ्रेश
साहित्य
ताजा आवळा - १ किलो
पाणी - आवश्यकतेनुसार
तूप - अर्धा कप
तीळाचे तेल - अर्धा कप
मध - दीड कप
गूळ किंवा साखरेची कँडी - ७०० ते ८०० ग्रॅम
अश्वगंधा पावडर - २५ ग्रॅम
विदारीकंद पावडर- २५ ग्रॅम
पिंपळ पावडर- १० ग्रॅम
दालचिनी पावडर - १० ग्रॅम
वेलची पावडर - १० ग्रॅम
नागकेसर पावडर - ५ ग्रॅम
लवंगा पावडर - ५ ग्रॅम
तमालपत्र पावडर - २ ते ३
सुंठ पावडर - १० ग्रॅम
मुळेठी पावडर - १० ग्रॅम
तुळशी पावडर - १० ग्रॅम
केशर - २ काड्या
कृती
1. सगळ्यात आधी आवळा स्वच्छ धुवून प्रेशर कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या. थंड झाल्यावर बिया काढून टाका आणि त्याचा गर काढा. मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्या.
2. आता एका पॅनमध्ये तीळाचे तेल आणि तूप गरम करा. त्यात आवळ्याचा गर घाला. मंद आचेवर सुमारे १५ ते २० मिनिटे चांगले परतवून घ्या. मिश्रण घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.
3. एका भांड्यात पाणी घालून गूळ वितळवून घ्या. एकतारी पाक तयार करुन हे मिश्रण गाळून घ्या. त्यानंतर तयार आवळ्याच्या मिश्रणात पाक घालून चांगले मिसळा.
4. वरुन सर्व मसाले पावडर घालून मिश्रणात चांगले मिसळून घ्या. सतत ढवळत राहा. मंद आचेवर १० ते १५ मिनिटे शिजवा. गॅस बंद करुन मिश्रण थंड होऊ द्या. त्यात मध घाला. हे साठवण्यासाठी स्वच्छ व कोरड्या काचेच्या भांड्यात ठेवा.
