मकर संक्रांत म्हटली की डोळ्यांसमोर येतात ते आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे गोड तिळाचे लाडू... तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला' असं म्हणत आपण एकमेकांना तिळाचे लाडू आणि तिळगुळ देतो. मऊ, लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे तिळाचे लाडू ही संक्रांतीची खरी मेजवानी... मकरसंक्रांतीचा सण तिळाच्या लाडूशिवाय अधूराच आहे. सणाच्या धावपळीत अनेकींना वेळ कमी पडतो आणि पारंपरिक पद्धतीने लाडू करणे कठीण वाटते. प्रत्येक घरोघरी हमखास तिळाचे लाडू तयार केले जातात, परंतु अनेकजणींना तिळाचे लाडू तयार करणे म्हणजे मोठे कठीण काम वाटते. तिळगुळाचे लाडू करताना पाकाचे गणित चुकले की लाडू एकतर खूप कडक होतात किंवा वळले जात नाहीत(how to make tilgul laddu in pressure cooker).
अनेकदा लाडू वळताना पाक बिघडण्याची किंवा लाडू कडक होण्याची भीती वाटते. तुम्हांला देखील हीच चिंता असेल, तर यंदा काळजी करू नका! प्रेशर कुकरचा वापर करून घरच्याघरीच अगदी कमी श्रमात मऊसूत आणि चविष्ट तिळाचे लाडू झटपट तयार करता येतात. तिळाचे लाडू तयार करताना तासंतास पाक चेक करण्याची कटकट सोडा, कारण आता प्रेशर कुकरमध्येही झटपट आणि मऊसूत तिळाचे लाडू तयार करू शकता. या संक्रांतीला सर्वांचे तोंड गोड करण्यासाठी प्रेशर कुकरचा (tilgul laddu recipe in pressure cooker) वापर करून मऊसूत तिळाचे लाडू तयार (pressure cooker tilgul laddu recipe) करण्याची खास रेसिपी पाहूयात...
प्रेशर कुकरमध्ये तिळगुळाचे लाडू कसे तयार करायचे...
साहित्य :-
१. पांढरे तीळ - १ कप २. शेंगदाणे - १/२ कप ३. गूळ - १ वाटी ४. साजूक तूप - १ टेबलस्पून
बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ! उडपी स्टाईल खमंग डाळ वडे - गुलाबी थंडीतील झक्कास बेत...
खमंग, खुसखुशीत मेथी वडी! एकदा केली तर घरातील सगळ्यांचीच होईल फेवरिट डिश - अस्सल पौष्टिक पदार्थ...
कृती :-
१. एक पॅन घेऊन तो व्यवस्थित गरम करून त्यात तीळ कोरडेच भाजून घ्यावेत. तीळ मंद आचेवर भाजून घ्यावेत. २. भाजून घेतलेले तीळ एका डिशमध्ये काढून ते थोडे थंड होऊ द्यावेत. ३. या भाजून घेतलेल्या तिळामधील अर्धे तीळ बाजूला ठेवून अर्धे तीळ मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. ४. एका बाऊलमध्ये, मिक्सरमध्ये वाटून घेतलेली तिळाची बारीक पूड आणि भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे थोडे क्रश करून एकत्रित करून घ्यावे.
५. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये नेहमीप्रमाणे पाणी घेऊन त्यात एक भांडं ठेवून त्यात किसलेला गूळ घालावा मग १ ते २ शिट्ट्या करून घ्याव्यात. यामुळे गूळ व्यवस्थित वितळतो. ६. वितळवून घेतलेल्या गुळात थोडेसे साजूक तूप, लाडूचे तयार करून ठेवलेलं मिश्रण घालून चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. ७. हाताला थोडेसे साजूक तूप लावून या मिश्रणाचे गोलाकार लाडू वळून घ्यावेत.
फारशी मेहेनत न घेता अगदी झटपट चविष्ट, मऊसूत प्रेशर कुकरमधील इन्स्टंट तिळाचे लाडू खाण्यासाठी तयार आहे.
Web Summary : Worried about hard til ladoos? This Makar Sankranti, use a pressure cooker for soft, delicious ladoos. This easy recipe uses simple ingredients like sesame seeds, peanuts, jaggery, and ghee for a quick, melt-in-your-mouth treat.
Web Summary : कठोर तिल के लड्डू से परेशान हैं? इस मकर संक्रांति पर, नरम, स्वादिष्ट लड्डू के लिए प्रेशर कुकर का उपयोग करें। यह आसान रेसिपी तिल, मूंगफली, गुड़ और घी जैसी सरल सामग्री का उपयोग करती है और झटपट मुंह में घुल जाने वाले लड्डू बनाती है।