Lokmat Sakhi >Food > यंदा संक्रांतीसाठी करा वाटीभर तिळाचा हलवा, खाऊन मन होईल तृप्त, खास पारंपरिक पदार्थ...

यंदा संक्रांतीसाठी करा वाटीभर तिळाचा हलवा, खाऊन मन होईल तृप्त, खास पारंपरिक पदार्थ...

Makar Sankranti Special Tilacha Halwa : Til Ka Halwa : Sesame Halwa : How To Make Tilacha Halwa At Home : मकर संक्रांतीसाठी लाडू - वड्या, चिक्की, गुळपोळी असे पदार्थ तर कराच, पण सोबत तिळाचा गोडधोड हलवा नक्की करून पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2025 14:09 IST2025-01-13T14:04:06+5:302025-01-13T14:09:47+5:30

Makar Sankranti Special Tilacha Halwa : Til Ka Halwa : Sesame Halwa : How To Make Tilacha Halwa At Home : मकर संक्रांतीसाठी लाडू - वड्या, चिक्की, गुळपोळी असे पदार्थ तर कराच, पण सोबत तिळाचा गोडधोड हलवा नक्की करून पाहा.

How To Make Tilacha Halwa At Home Makar Sankranti Special Tilacha Halwa Til Ka Halwa Sesame Halwa | यंदा संक्रांतीसाठी करा वाटीभर तिळाचा हलवा, खाऊन मन होईल तृप्त, खास पारंपरिक पदार्थ...

यंदा संक्रांतीसाठी करा वाटीभर तिळाचा हलवा, खाऊन मन होईल तृप्त, खास पारंपरिक पदार्थ...

मकर संक्रांती नवीन वर्षातील पहिलावहिला सण. या खास सणादरम्यान (Makar Sankranti Special Tilacha Halwa) तिळगूळ ओघाने आलेच. तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ (Til Ka Halwa) असल्याने थंडीच्या दिवसांत हे  दोन्ही आवर्जून खायला हवेतच. आपले सण हे धार्मिक गोष्टीने महत्वाचे असतातच पण शास्त्रीय दृष्ट्याही त्यामागे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळगूळ करण्याची लगबग सुरू होते. यामध्ये कोणी तिळाचे लाडू, कडक वड्या, तिळपापडी (Sesame Halwa) असे प्रकार करतात. पण घरात वयस्कर व्यक्ती किंवा लहान मुले असतील तर त्यांना चावायला आणि खायला सोपे जाईल असे पदार्थ घरोघरी हमखास तयार केले जातात(How To Make Tilacha Halwa At Home).

संक्रांती निमित्ताने आपण तिळाचे अनेक पदार्थ तर करतोच, तिळाचे लाडू - वड्या, चिक्की हे नेहमीचेच पदार्थ. परंतु यंदाच्या संक्रांतीला आपण खास तिळाचा हलवा तयार करु शकतो. झटपट तयार होणारा हा तिळाचा हलवा तयार करण्यासाठी फारशी मेहेनत घ्यावी लागत नाही. अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात आपण पटकन हा तिळाचा गोडधोड हलवा तयार करु शकतो. मकर संक्रांतीसाठी नेहमीचे लाडू - वड्या, चिक्की, गुळपोळी असे पदार्थ तर कराच, पण सोबत हा तिळाचा गोडधोड हलवा नक्की करून पाहा. तिळाचा हलवा घरच्याघरीच तयार करण्याची साधी सोपी रेसिपी सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या संजीव कपूर खजाना या युट्युब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य :- 

१. पांढरे तीळ - २ कप
२. पाणी - गरजेनुसार 
३. पिठीसाखर - १ कप 
४. बदाम काप - १/२ कप 
६. ड्रायफ्रुटस काप - १/२ कप
७. साजूक तूप - १ कप 
८. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 
९. बारीक रवा - १ कप 
१०. केसर - १० ते १२ काड्या (पाण्यांत किंवा दुधात भिजवून घेतलेल्या)

हिवाळ्यात स्वस्त मिळतात मटार, घरी ‘असे’ करा फ्रोजन मटार, रंग आणि स्वाद वर्षभर टिकेल...

तिळाच्या वड्या करताना लक्षात ठेवा ५ टिप्स, वड्या कडक - मऊ - चिकट न होता, परफेक्टच होतील...

कृती :- 

१. एक मोठं खोलगट भांड घेऊन त्यात पांढरे तीळ व गरजेनुसार पाणी घालून तीळ ६ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवा. 
२. तीळ व्यवस्थित भिजल्यानंतर हे तीळ आणि थोडं पाणी घेऊन मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर भरड करून घ्यावी. 
३. एका पॅनमध्ये बारीक रवा घेऊन तो कोरडा भाजून घ्यावा. रवा भाजून घेतल्यानंतर तो एका डिशमध्ये काढून थोडा थंड होऊ द्यावा. 
४. आता एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात भाजलेला रवा घालून पुन्हा एकदा हलका भाजून घ्यावा. 
५. रवा भाजून घेतल्यानंतर त्यात तिळाची वाटून घेतलेली पेस्ट घालावी. आता रवा आणि तिळाची पेस्ट एकत्रित साजूक तुपात खमंग परतून घ्यावे. 

तिळाचे लाडू वळताना हाताला चटके बसतात? २ ट्रिक्स, चटके न बसता वळा एका आकाराचे परफेक्ट लाडू...

६. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण पातळ करून घ्यावे. 
७. आता हा तिळाच्या हलव्यात भिजवलेलं केसर व पिठीसाखर किंवा (नेहमीच्या साखरेची बारीक पूड करून घालावी.)     
८. तिळाचा हलवा २ ते ३ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावा. 
९. सगळ्यात शेवटी वरून आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुटस तसेच बदामाचे काप आणि वेलची पूड घालावी.   

मकरसंक्रांतीसाठी तिळाचा हलवा खाण्यासाठी तयार आहे. आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटस तसेच बदामाचे काप वरून भुरभुरवून हा गरमागरम तिळाचा हलवा खाण्यासाठी सर्व्ह करावा.

Web Title: How To Make Tilacha Halwa At Home Makar Sankranti Special Tilacha Halwa Til Ka Halwa Sesame Halwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.