विकतचे दही आणण्यापेक्षा अनेकांना घरी ताजं विरजण लावायला जास्त आवडतं.(Homemade curd) बाजारातील दह्यापेक्षा घरचं दही अधिक ताजं, पौष्टिक आणि चविष्ट असतं.(Curd starter tips) पण अनेकदा घरी तयार केलेलं विरजण खूप आंबट होतं किंवा घट्ट होण्याऐवजी ते पातळ आणि चविष्ट बनत नाही.(Thick curd recipe) त्याच्या चवीमुळे आपल्या दही फेकून देण्याशिवाय काही पर्याय नसतो.(Dahi without sour taste) पण अशावेळी दूध उकळलं किंवा योग्य तापमानात थंड केलं तरी देखील फारसं चांगले होत नाही.(Kitchen tips for perfect curd) त्यामुळे घरी विरजण आपण लावतं नाही. बाजारात मिळणारं रेडीमेड दही विकत आणतो. या आंबट दह्याची चव सुधारण्यासाठी आणि त्याला गोडी आणण्यासाठी आपण ही १ सोपी ट्रिक वापरली तर विकतसारखे दही घरीच बनेल.
सकाळच्या नाश्त्याला करा चटपटीत पारंपरिक सुशीला, फक्त १० मिनिटांत तयार- चवही भन्नाट
दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया असतात जे दुधाचे रुपांतर दह्यामध्ये करतात. दही जास्त काळ बाहेर ठेवल्याने हे बॅक्टेरिया अधिक सक्रिय होऊन दह्याला आंबट करतात. उन्हाळ्यात ही प्रक्रिया अधिक वेगाने होते. दह्याचा आंबटपणा घालवण्यासाठी आपल्याला २ गोष्टींची आवश्यकता आहे. दूध आणि चाळणी. सगळ्यात आधी दह्याला चाळणीत घाला. आणि त्याचे संपूर्ण पाणी काढून टाका. यामुळे आंबटपणा बऱ्याच प्रमाणात कमी होईल. आता उरलेल्या जाड दह्यात २ ते ३ चमचे ताजे दूध घाला आणि ते चांगल्याप्रकारे मिसळा. या प्रक्रियेनंतर दही मलईदार आणि घट्ट होईल.
जर आपल्याला दुधाचा वापर करायचा नसेल तर ताजे दही आणि आंबट दही मिसळून त्याची चव एकसारखी करु शकता. यासाठी आपल्याला ताजे दही आणि आंबट दही समान प्रमाणात घ्यावे लागेल, त्यानंतर चांगले फेटून घ्या. याची चव अगदी ताज्या दह्यासारखी लागेल.
दही फेकून देण्याऐवजी आपण त्यापासून विविध पदार्थ तयार करु शकतो. तसेच मॅरीनेट करण्यासाठी देखील दह्याचा वापर करता येईल. पनीर टिक्का किंवा इतर भाज्यांसाठी आंबट दही मॅरीनेटर आहे कारण ते मसाले चांगल्या पद्धतीने शोषून घेते. जर दही जास्त दिवस फ्रेश ठेवायचे असेल तर नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. यात कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि पचनक्रिया सुरळीत होते.