Join us
Daily Top 2Weekly Top 5

चहाचा घोट घेताच मन होईल तृप्त! चिमूटभर 'हा' चहा मसाला घाला - थंडी जाईल पळून मिळेल ऊब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2025 15:25 IST

how to make the perfect desi chai masala in just 10 minutes at home : how to make desi chai masala at home : homemade chai masala recipe : अवघ्या १० ते १२ मिनिटांत चहा मसाला करण्याची साधीसोपी रेसिपी...

बाहेर हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा तडाखा पडला की, एकच गोष्ट आठवते ती म्हणजे गरमागरम वाफाळत्या चहाचा कप! साध्या चहापेक्षाही, थंडीच्या दिवसांत आपल्या शरीराला ऊब आणि ऊर्जा देणारा एक खास प्रकार म्हणजे फक्कड असा मसाला चहा... शरीराला ऊब देणारा, घशातील खवखव दूर करणारा आणि दमलेल्या शरीराला रिलॅक्स करणारा चहा हिवाळ्यात तर जणू अमृतच...हिवाळ्यात गरमागरम कडक, मसालेदार चहा प्यायला सगळ्यांनाच आवडतो. मसाला चहाचं नाव काढलं की वेळ कोणतीही असो चहा प्यावासा वाटतोच. मसाला चहाचा सुगंध, त्याचा कडकपणा यामुळे जी तरतरी येते त्याला तोड नाही. चहात घातलेल्या मसाल्यामुळे तरतरी येते, मूड फ्रेश होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढून अनेक आजारांपासून संरक्षणही होते(how to make the perfect desi chai masala in just 10 minutes at home).

मसाला चहा फक्त आपल्या जिभेला एक अनोखी चवच देत नाही, तर त्यातील नैसर्गिक उष्णता देणारे घटक आल, लवंग, वेलची सर्दी, खोकला आणि कफ यांसारख्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून काम करतात. हा चहा प्यायल्यावर तुम्हाला आतपर्यंत ऊब मिळाल्याचा अनुभव येतो. बाजारात तयार चहा मसाले मिळतात, पण त्यात अनेकदा भेसळ किंवा कृत्रिम घटक असण्याची शक्यता असते. यासाठीच, चहा मसाला विकतचा आणण्यापेक्षा घरीच केल्यास विकतच्या तुलनेत कमी खर्चात भरपूर मसाला तयार होतो आणि चवही छान लागते. चहा मसाला घरीच करताना खूप मोठा व्याप करावा लागत नाही, अवघ्या १० ते १२ मिनिटांत चहा मसाला (how to make desi chai masala at home) करण्याची साधीसोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. मोठी काळी वेलची - ४२. छोटी हिरवी वेलची - १ टेबलस्पून ३. काळीमिरी - १/२ टेबलस्पून ४. लवंग - १ टेबलस्पून ५. दालचिनी - २ ते ३ काड्या६. चक्रफुल - १७. बडीशेप - १ टेबलस्पून ८. सुपारी - १/२ टेबलस्पून ९. मुलेठी - १/२ टेबलस्पून १०. सुक्या गुलाबाच्या पाकळ्या - १ टेबलस्पून ११. सुंठ पावडर - १/२ टेबलस्पून 

वाटीभर तांदुळाचा करा नीर डोसा! ना पीठ फुलून येण्याची झंझट, ना तेलाची गरज - तरीही डोसा होईल बेस्ट... 

हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला विसरा! कणकेत ४ पदार्थ मिसळून करा पौष्टिक चपाती - वाढेल रोगप्रतिकारकशक्ती, मिळेल ऊबदारपणा...

कृती :- 

१. सर्वप्रथम गॅसच्या मंद आचेवर पॅन गरम करत ठेवावा. २. पॅन हलकेच थोडा गरम झाल्यावर त्यात मोठी काळी वेलची, छोटी हिरवी वेलची,  काळीमिरी, लवंग, दालचिनी, चक्रफुल, बडीशेप, सुपारी, मुलेठी हे सर्व जिन्नस घालावेत. ३. आता हे सर्व जिन्नस एकत्रित करून किमान ४ ते ५ मिनिटे कोरडे भाजून घ्यावेत. गॅस बंद केल्यावर त्यात सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घालाव्यात. 

४. त्यानंतर हे भाजून घेतलेले जिन्नस थोडे गार होण्यासाठी एका पसरट भांड्यात काढून घ्यावेत.५. हे सर्व जिन्नस गार झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यातून ओतून घ्यावे.६. आता मिक्सरच्या भांड्यात हे सर्व भाजून घेतलेले जिन्नस घातल्यावर थोडी सुंठ पावडर देखील घालावी. मग मिक्सरमध्ये सगळे जिन्नस एकत्रित फिरवून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. 

कडक, चवदार आणि झटपट होणारा असा घरगुती चहा मसाला तयार आहे. चहा तयार करताना आपण आपल्या आवडीनुसार हवा तेवढा चहा मसाला घालून चहाची चव दुपटीने वाढवू शकतो.

टॅग्स :अन्नपाककृतीहिवाळ्यातला आहार